स्वच्छतेत चंद्रपूरची भरारी – देशात २१ वा क्रमांक, ‘३ स्टार सिटी’चा सन्मान

स्वच्छतेत चंद्रपूरची भरारी – देशात २१ वा क्रमांक, ‘३ स्टार सिटी’चा सन्मान

चंद्रपूर १९ जुलै – स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ अंतर्गत ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये चंद्रपूर शहराने देशात २१ वा क्रमांक प्राप्त केला आहे. यासोबतच चंद्रपूर शहराला स्वच्छतेसाठी ३ स्टार सिटी म्हणून गौरविण्यात आले आहे.

स्वच्छतेविषयक अहवालानुसार, चंद्रपूर महानगरपालिकेने डोअर टू डोअर (घरपोच) कचरा संकलन ९३% प्रमाणात यशस्वीरीत्या राबवले जात आहे. तसेच ७६% नागरिक ओला व सुका कचरा वेगवेगळा करतात, हे ही एक महत्त्वाचे पाऊल आहे. विशेष म्हणजे संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते आणि शहराने ओपन डिफेकेशन फ्री (ODF++) दर्जा कायम राखलेला आहे.

मागील वर्षी चंद्रपूर शहराला देशात ४८ वा क्रमांक प्राप्त झळझ होता. यंदा घनकचरा संकलन, प्रक्रिया केंद्रांची गुणवत्ता व नागरिकांचा स्वच्छतेतील सहभाग वाढल्यामुळेच आपण २१व्या क्रमांकावर पोहोचलो. आगामी काळात सीवरेज प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चंद्रपूर देशातील टॉप १० शहरांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास आहे – आयुक्त विपीन पालीवाल