21 जून रोजी पालकमंत्री डॉ. अशोक उईके चंद्रपुरात

21 जून रोजी पालकमंत्री डॉ. अशोक उईके चंद्रपुरात

चंद्रपूर, दि. 20 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे 21 जून रोजी चंद्रपूर येथे येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

21 जून रोजी सकाळी 6.10 वाजता वन अकादमी येथून जिल्हा क्रीडा संकूलकडे प्रयाण, सकाळी 6.30 ते 8.30 वाजता बॅडमिंटन हॉल येथे आंतराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाला उपस्थिती, सकाळी 9.30 वाजता सुजल प्रकाश गेडाम या विद्यार्थ्याचा सत्कार, सकाळी 10.30 वाजता नियोजन भवन येथे महसूल विभागाच्या सहा वाहनांचे लोकापर्ण कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12.30 वाजता चंद्रपूरवरून यवतमाळकडे प्रयाण.