मधमाशी मित्र पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रित

मधमाशी मित्र पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रित

भंडारा, दि. 4 : राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यातील मध उद्योगाला चालना व गती देण्यासाठी सन 2023-24 पासून मधमाशी मित्र पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील मध उद्योगात कार्य करणाऱ्या मधपाळ, प्रगतीशील मधपाळ, मधपाळ शेतकरी सातेरी, मेलीफेरा, आग्या मधमाशापालन, मध संकलन ईत्यादीमध्ये कार्यरत असणाऱ्यांची निवड करून मधमाशी मित्र पुरस्कार वितरित केला जाणार आहे. पुरस्काराच्या अर्जाचा नमुना राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, जांभुळकर निवास, बाबा मस्तानशहा वार्ड, सिंडिकेट बँकेच्या मागे, भंडारा येथे उपलब्ध असून अर्जाचा नमुना दिनांक 8 मे 2023 पर्यंत भरून जिल्हा कार्यालयात जमा करायचा आहे, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सी.वी.देविपुत्र यांनी कळविले आहे.