पोलीस असल्याचे बतावणी करणाऱ्या भामट्या गुन्हेगारांपासुन सावधान
जिल्हयात वृध्द पुरूष व महिलांचे दागिने लुटण्याची दोन घटना
चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, काही भामटे गुन्हेगार मोटार सायकलवर साध्या वेषात फिरून स्वतःला पोलीस असल्याचे बतावणी करून विशेषतः रस्त्यावर काही कामानिमित्य घरून पायदळ निघालेल्या एकटे-दुकटे पुरूष व महिलांना लक्ष करून त्यांना दागिन्यांसाठी लोकांची हत्या होत असल्याचे किंवा इतर काही खोटे कारण सांगुन त्यांनी घातलेल्या त्यांच्या अंगावरील दागिणे तत्काळ काढुन एखाद्या रूमालात किंवा कागदात गुंडाळुन ठेवण्याबाबत सांगुन हातचालाखीने सदर कागद व रूमालात ठेवलेले दागिने लंपास करून पळ काढीत आहेत.
तरी सर्वांनी अशा प्रकारच्या साध्या वेषातील तोतया पोलीसांना त्यांचे ओळखपत्र मागुन तात्काळ जवळील पोलीस स्टेशन किंवा पोलीस नियंत्रण कक्ष येथील टोल फ्री क्रमांक ११२ वर डायल करून माहिती द्यावी.
चंद्रपूर पोलीस हे गणवेषातच पेट्रोलींग करीत असुन अशा प्रकारे दागिणे काढुन रूमालात ठेवण्याबाबत कुणालाही सांगत नाही. करीता सर्वांनी सावधानता बाळगावी. अशा भामट्या बद्दल माहिती पोलीसांना देऊन सहकार्य करावे.