डी.एल.एङ प्रथम वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया  सुरू 

डी.एल.एङ प्रथम वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया  सुरू 

                  भंडारा दि. 7 ऑगस्ट  : शैक्षणिक वर्ष सन 2023-24 साठी डी.एल.एङ प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे.तरी याबाबतचे वेळापत्रक.ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना प्रथम प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयाची यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे यांचे www.maa.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

      तरी शासकीय कोटयातील संधी प्रवेशासाठी 3 ऑगस्ट, 2023 ते 7 ऑगस्ट, 2023 या कालावधीत www.maa.ac.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना भरता येतील.तसेच अर्ज भरण्यासाठी उमेदवारांचा स्वत: चा ई-मेल असणे बंधनकारक आहे.तरी प्रवेश अर्ज शुल्क खुला संवर्ग रुपये 200,खुला संवर्ग वगळून अन्य मागास संवर्गासाठी रूपये 100 असे राहील.उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज करावयाचा असेल तर प्रत्येक माध्यमाचा संवर्गानुसार स्वतंत्र आवेदनपत्र व शुल्क भरावे लागेल.

प्रवेश अर्ज शुल्क स्विकारण्याची पध्दती प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन payment/gateway/E-Wallet स्वत:चे किंवा नातेवाईकाचे क्रेडीट कार्ड,डेबिट कार्ड याद्वारे स्विकारले जाईल.प्रवेश पात्रता-प्रवेशास इच्छुक असणारे कला.वाणिज्य,विज्ञान व एम.सी.व्हि.सी.शाखेतील पात्र उमेदवार इयत्ता बारावी खुल्या संवर्गासाठी किमान 49.50 टक्के गुण व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्गासाठी किमान 44.50 टक्के गुणासह उत्तीर्ण असणे आवश्‌यक आहे.

व्यवस्थापन कोटयातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे.उमेदवारांना प्रवेश अर्ज भरताना तांत्रिक अडचणी असल्यास अशा अडचणी स्वत:च्या registered  Email वरुन support@deledadmission या ई-मेल वर पाठवाव्यात या विशेष फेरीमधून इ.12वी उत्तीर्ण झालेले व नव्याने प्रवेश अर्ज भरण्यास इच्छुक असलेले उमेदवार,नियमित डी.एल.एङप्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन प्रवेश अर्ज पूर्ण न भरलेले submit/approve न केलेले विद्यार्थी,दुरुस्ती Correction न केलेले विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश फेरीमधून प्रवेश न घेतलेले विद्यार्थी भाग घेऊ शकतील.

ज्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश प्रक्रियेमध्ये अध्यापक विद्यालय मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांनी आपले पसंतीक्रम बदलून द्यावेत.ज्या अध्यापक विद्यालयात जागा रिक्त आहे.त्या अध्यापक विद्यालयाचा पसंतीक्रम ज्या विद्यार्थ्यानी यापूर्वी डी.एल.एङऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रवेशासाठी ऑनलाईन शुल्क भरले आहे.त्यांनी संधी प्रवेश फेरीसाठी नव्याने शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.परंतु त्यासाठी जो ई-मेल आय डी व मोबाईल क्रमांक रजिस्टर केला आहे.तोच ई-मेल आय. डी. व मोबाईल क्रमांक वापरणे गरजेचे आहे.

प्रेवेशाबाबतचे वेळापत्रक संकेत स्थळावर प्रसिध्दी केले जाईल.तसेच या बाबत वर्तमानपत्रात पुन्हा स्वतंत्र जाहिरात दिली जाणार नाही.त्यासाठी उमेदवाराने वेळोवेळी संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,प्रार्चाय राजेश रुद्रकार यांनी कळविले आहे.