जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली आणि कारमेल हॉयरकुल, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिक्षण शिबीर संपन्न

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली आणि कारमेल हॉयरकुल, गडचिरोली
यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिक्षण शिबीर संपन्न

गडचिरोली, दि.02: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे समान किमान कार्यक्रमानुसार
माहे नोव्हेंबर -२०२३ मध्ये “बालकांकरीता” विशेष कार्यक्रम घेणेबाबत निर्देश दिलेले होते. त्याअनुषंगाने यु.एम.मुधोळकर, प्र. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा प्र. अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे मार्गदर्शनानूसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली आणि कारमेल हॉयरकुल, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २८/११/२०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता कारमेल हॉयस्कुल, गडचिरोली येथे कायदेविषयक शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम घेण्यामागील उद्देश म्हणजेच बालकांचे मुलभूत अधिकार, बालकांचे संरक्षणाबाबतची योजना, बालकांकरीता कायदेशीर सेवा, लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण-२०१२, अंमली पदार्थ, अशा विविध विषयावर बालकांकरीता कायदेविषयक
शिक्षण शिबिराचे आयोजन कारमेल हॉयरकुल, गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले.
कायदेविषयक शिक्षण शिबिरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, आर.आर. पाटील हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे कु. स्नेहा ए. मेश्राम, सहाय्यक लोक अभिरक्षक, लोकअभिरक्षक कार्यालय, गडचिरोली हया सुध्दा उपस्थित होत्या. तसेच व्यासपीठावर कारमेल हॉयस्कुल, गडचिरोली चे मुख्याध्यापक फादर जिनेश मॅथ्यु आणि सिस्टर नानसी टॉम हे विराजमान होते. प्रास्ताविक भाषणातुन कु. स्नेहा ए. मेश्राम, सहाय्यक लोकअभिरक्षक, लोकअभिरक्षक कार्यालय, गडचिरोली यांनी उपस्थित विद्यार्थी/विद्यार्थीनीना लैंगिक अपराधारापासुन बालकांचे संरक्षण-२०१२ बाबत संपूर्ण माहिती दिली. बालकांचे संविधानिक मुलभूत अधिकाराबाबतची माहिती सांगितली. तसेच रेगिंग, बालकांचे हक्क व अधिकाराबाबतची माहिती दिली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर.पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी/विद्यार्थीनीना बालकांच्या संरक्षणाबाबतच्या विविध योजनांची आणि बालकांकरीता कायदेशीर सेवेबद्दलची महत्वाची सविस्तर माहिती दिली.