कोंबडाची झुंज लावुन जुगार खेळणारे ७ आरोपी अटक ७ दुचाकीसह एकुण ४,५९,३३०/- रु. चा मुद्देमाल जप्त पोलीस स्टेशन भद्रावती ची कारवाई
दिनांक २८ मे, २०२५ रोजी पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत मौजा तिरवंजा गावातील शेतालगत असलेल्या झुडपी जंगल परिसरात काही इसम कोंबडयाचा पायाला कत्या बांधुन त्याची झुंज लावुन कोंबडा जुगार खेळ खेळीत असल्याचे गोपनिय माहितीवरुन भद्रावती पोलीसांनी सदर ठिकाणी छापा टाकुन सदर ठिकाणाहुन एकुण ७ आरोपी अटक करुन त्यांचे ताब्यातुन नगदी रोख रक्कम, व कोंबळे १ मृत, १ जखमी, २ जखमी कोंबडे, दोन कात्या, सात मोटार सायकल असा एकुण ४,५९,३३०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोम साटम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती लता वाडीवे यांचे नेतृत्वात सफौ महेंद्र बेसरकर, पोहवा अशोक मंजुळकर, अनुप आष्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, गजानन नागरे, पोअं. खुशाल कावळे, शैलेश दुर्गेमवार, रोहीत चिटगीरे सर्व पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली आहे.