दुचाकी मोटार सायकल चोरी करणारे दोन आरोपी अटक ४ वाहने जप्त; स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कारवाई

दुचाकी मोटार सायकल चोरी करणारे दोन आरोपी अटक ४ वाहने जप्त; स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कारवाई

दिनांक २६ मे, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील नामे राकेश अमर वाडके वय २६ वर्ष रा.बाबुपेठ वार्ड चंद्रपुर यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातील विविध पोलीस स्टेशन मधील चोरीस गेलेले ४ नग दुचाकी वाहने ज्यात –

(१) पोलीस स्टेशन बल्लारपूर अपराध क्रमांक ७८१/२०२५ कलम ३०३ (२) BNS मधील हिरो पॅशन प्रो मोटार सायकल क्र. MH34-AR-0452

(२) पोलीस स्टेशन भावती अपराध क्रमांक २४८/२०२५ कलम ३०३ (२) BNS मधील हिरो स्प्लॅन्डर मोटार सायकल क्र. MH36-R-4068

(३) पोलीस स्टेशन रामनगर अपराध क्रमांक ४६९/२०२५ कलम ३०३ (२) BNS मधील हिरो स्प्लॅन्डर मोटार सायकल क्र. MH34-X-3752

(४) बेवारस होन्डा अॅक्टीवा क्र. MH34-CB-4984, असा एकुण १,७०,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आलार आहे. गुन्हयाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात सहा. पोलीस निरीक्षक श्री बलराम झाडोकर, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोहवा जयसिंग, गणेश मोहुर्ले, दिनेश अराडे, नापोअं संतोष येलपुलवार, पोअं नितीन रायपुरे, मिलींद जांभुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.