संस्थेच्या पुढाकाराने सिंदेवाही मरेगाव येथे ग्राम बाल संरक्षण समिती गठित

संस्थेच्या पुढाकाराने सिंदेवाही मरेगाव येथे ग्राम बाल संरक्षण समिती गठित

आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे प्रकल्प समनव्यक सैदुल टेकाम यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रनात सिंदेवाही तालुक्यात आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत आश्रमशाळा स्तरावर बाल संरक्षण प्रणाली स्थापन करणे बाल मैत्रीपूर्ण आश्रमशाळा कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर प्रकल्प कार्यालय येथील ०८ शासकीय आश्रमशाळेमध्ये वर्ष २०२४ पासून राबविला जात आहे. त्याच अनुषंगाने शासन निर्णय १० जून २०१४ नुसार प्रत्येक गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करून बालकांच्या संदर्भात काळजी व संरक्षण, शिक्षण, आरोग्य, शोषण आणि इतर असुरक्षित बाबीसाठी काम करणे आणि तात्काळ सहकार्य करणे आवश्यक आहे परंतू गेल्या १० वर्षपासून मरेगाव येथे ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन नव्हती आणि कार्यरत नव्हती त्यामुळे दिनांक २४-०५-२०२५ रोज शनिवारला ग्रामपंचायत कार्यालय मरेगाव येथे गावातील लोकांना एकत्रित करून ग्राम बाल संरक्षण समिती गठीत करण्यात आली.

सर्वप्रथम गावातील सर्व लोकांना ग्राम बाल संरक्षण समितीबाबत १० जून २०१४ चा शासन निर्णय समजाऊन देऊन ग्राम बाल संरक्षण समितीचे कार्य, सदस्य नेमणूक, सदस्य यांची भूमिका व जबाबदारी, समितीचा कालावधी आणि गांवमध्ये बालकांसाठी करावयाची कार्ये आणि बैठका याबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.

त्यानंतर सर्वानुमते ग्राम बाल संरक्षण समितीची स्थापना करून अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच श्री.संदीप बाबूराव ठाकरे आणि सचिव म्हणून अंगणवाडी सेविका सौ.रेशमा सलामे यांची निवड करून इतर सदस्यांमध्ये गावातील आशा वर्कर,१२ ते १६ वयोगटातील युवक व युवती, पोलिस पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, आश्रमशाळा येथील अधिक्षिका आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक असे समितीमध्ये एकूण १२ लोकांची निवड करण्यात आली.

सदर ग्राम बाल संरक्षण समिती गठीत केल्यावर सर्व सदस्यांना बालकांची व्याख्या सांगून बालकांचे चार अधिकार विविध उदाहरणे देऊन सांगण्यात आले ज्यामध्ये जगण्याचा अधिकार, विकासाचा अधिकार, सहभागाचा अधिकार आणि संरक्षणाचा अधिकार सांगून गावातील प्रत्येक बालकांविषयी समिती किती महत्वाची आहे आणि असुरक्षित बालकांबाबत आपली भूमिका किती तातडीने काम करण्यास सक्षम राहील याविषयी जागरूकता करण्यात आली.