विधी संघर्ष बालकाचे ताब्यातून वेगवेगळया चोरीच्या गुन्हयातील दोन दुचाकी वाहने जप्त स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची कारवाई …
दिनांक १८/०५/२०२५ रोजी रेल्वे स्टेशन चौक चंद्रपूर येथे बिना नंबर प्लेटची मोटार सायकल विक्री करीता ग्राहकाचे शोधात फिरत असल्याचे गोपनिय माहिती वरुन सदर ठिकाणी सापळा रचुन एक विधी संघर्ष बालकास ताब्यात घेवुन कौशल्यपुर्ण तपास करुन बारकाईने विचारपुस केली असता त्याचे कडुन वेगवेगळया ठिकाणाहुन चोरलेल्या एकुण २ मोपेड दुचाकी वाहन होंडा अॅक्टीवा क्रमांक MH34-CP-1191 आणि MH49-AU-8109 अशी दोन वाहने जप्त करण्यात आले आहे. सदर वि.सं. बालकाविरुध्द नागपूर शहर येथे चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचे नेतृत्वात पोउपनि श्री विनोद भुरले, पोउपनि श्री सुनिल गौरकार, पोहवा/सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, पोअं प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शेशांक बदामवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.