तक्रार समिती स्थापन करून पोर्टलवर माहिती देणे बंधनकारक Ø कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम

तक्रार समिती स्थापन करून पोर्टलवर माहिती देणे बंधनकारक

Ø कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम

चंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक खाजगी आस्थापना जिथे 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी (महिला व पुरूष मिळून) कार्यरत आहे, अशा ठिकाणी, महिलांचे लैंगिक छळापासून सरंक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, 2013 अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून याबाबतची माहिती SHE BOX PORTAL वर नोंदविणे बंधनकारक आहे.

प्रत्येक खाजगी आस्थापना, कंपनी, एम.आय.डी.सी. मॉल, शैक्षणिक संस्था, दुकाने, बँक, अशासकीय संस्था, ट्रस्ट, सोसायटी, उत्पादक, पुरवठा, वितरण व विक्री, करमणुक, क्रीडा संकुले, प्रेक्षागृहे, आरोग्य सेवा देणारे आदींनी त्यांच्या आस्थापनेवर तक्रार समितीची स्थापना करावी तसेच व त्याबाबतची माहिती पोर्टलवर नमुद करावी. सदर माहिती नोंदविण्याकरीता https://shebox.wcd.gov.in या संकेतस्थळावर जाऊन होम स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे Private Head Office Registration या Tab वर click करावे. आवश्यक सर्व माहितीचा तपशील भरून Submit या Tab वर click करून अंतर्गत तक्रार समितीची माहिती नोंदविता येईल.

अधिनियमातील कलम 26 मध्ये जर एखाद्या मालकाने अ) अंतगर्त तक्रास समिती स्थापन केली नाही ब) अधिनियमातील कलम 13, 14 व 22 नुसार कार्यवाही केली नाही क) या अधिनियमातील व नियमातील विविध तरतुदीचे व जबाबदाऱ्याचे पालन न केल्यास मालकास 50 हजार रुपयेपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच हा प्रकार पुन्हा घडल्यास आस्थापनेचा परवाना रद्द, दुप्पट दंड अशी तरतुद आहे.

करीता सर्व, खाजगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापना करून त्याबाबतीची माहिती SHE BOX PORTAL वर भरण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. याबाबत काही तांत्रिक अडचण असल्यास दूरध्वनी क्रमांक. 011-23388074 किंवा ई मेल – techsupport-shebox@gov.in येथे संपर्क करावा, असे महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.