भंडारा जिल्ह्यात धान खरेदी करिता 190 धान खरेदी केंद्रे कार्यान्वित
भंडारा,दि.27 : आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पणन हंगाम 2024-25 करिता धान खरेदी करीता शासनाचे BeAM पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीकृत शेतकऱ्यांचा धान विक्री करता यावा, यासाठी जिल्ह्यातील 190 खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. खरीप पणन हंगाम 2024-25 करिता आधारभूत किंमत 2300/- रुपये आहे. तरी भंडारा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी नजिकच्या धान खरेदी केंद्रावर धान विक्री करून आधारभूत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मा. जिल्हाधिकारी महोदय यांनी केले आहे.
शेतकरी नोंदणी तथा धान खरेदीसाठी नव्याने कार्यान्वित झालेले संस्थांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
अ.क्र.
तालुका
सब एजंट संस्थेचे नाव
केंद्राचे नाव
1
तुमसर
दि सिहोरा सहकारी राईस मिल, सिहोरा
सिहोरा
2
पवनी
संताजी अभिनव सर्वसाधारण बहु.सहकारी संस्था मर्या.बोरगाव (चौ.)
ईसापुर
3
लाखांदूर
संजिवनी बहु सेवा सह संस्था मर्या चप्राड
चप्राड
4
पवनी
अटल अभिनव सर्व-सह-संस्था भेंडारा
भेंडारा
5
लाखांदूर
धनश्री बहुउद्देशिय सुशि.बेरो.सेवा सह.संस्था मर्या.कुडेगाव
सोनी
6
साकोली
सिद्धीविनायक अभिनव शेतकी सामुग्री खरेदी विक्री बहु. सेवा सहकारी संस्था कटंगधरा
कटंगधरा
7
लाखनी
लक्ष्मी बहु सह संस्था मर्या एकोडी
रेंगेपार कोहली
8
लाखांदूर
आदर्श बहु सुशि बेरो सेवा सह मर्या दीघोरी/मो.
दीघोरी/मो.
9
लाखनी
ईश्वर बहुउद्देशिय सहकारी संस्था मर्या.मिरेगाव
डोंगरगाव
10
पवनी
शेतकरी बहु-सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या-पिंपळगाव नि.
भावड
11
लाखनी
मातोश्री बहु. सु.बे. सह. संस्था मर्या. झरप
झरप
12
पवनी
शेतकरी राजा अभि बहु.सर्व.सह.संस्था मर्या. आकोट
आकोट 1
13
साकोली
अन्नदाता अभिनव सर्वसाधारण सेवा सहकारी संस्था मर्या. जांभळी/सडक
जांभळी/सडक
14
मोहाडी
मागासवर्गिय महिला सुशि.बेरो.सह.संस्था मर्या.डोंगरगाव
पिंपळगांव
15
साकोली
देवांशी बहुउद्देशिय सहकारी संस्था मर्या.बाम्पेवाडा
आतेगाव
16
साकोली
बोधीसत्व बहु.सुशि.बेरो.सेवा सह. संस्था विहिरगाव
विहिरगाव
17
पवनी
भाग्यश्री बहु.अभि.सर्व.सेवा सह संस्था मर्या पवनी
पालोरा N
18
तुमसर
नवनित बहु. सुशिक्षीत बेरोजगार सह.संस्था, तुमसर
मेहगाव
19
लाखनी
जिजाऊ महिला बहुउद्देशिय सह.संस्था मर्या. एकोडी
राजेगाव
20
तुमसर
अन्नपूर्णा बहु. सर्वसाधारण सह. संस्था मर्या.नेरी
नकुल सुकडी
21
मोहाडी
बेटाळा
22
तुमसर
जयकिसान शेतकरी बहु. सर्व. सह.संस्था मर्या. एकलारी
सिलेगाव
23
मोहाडी
अन्नपूर्णा बहु सर्व सह संस्था मर्या एकलारी
नेरी
24
मोहाडी
आदर्श सुशि.बेरो.सहकारी सस्था मर्या.वरठी
धुसाला
25
मोहाडी
गुरूदेव शेतकरी सुशि.बेरो.सहकारी सस्था मर्या.वरठी
सकरला
26
मोहाडी
बाबा शेतकरी सुशि.बेरो.सहकारी सस्था मर्या.वरठी
वरठी
27
मोहाडी
आर्शिर्वाद सुशि.बेरो.सहकारी सस्था मर्या.वरठी
खुटसावरी
28
मोहाडी
जयकिसान शेतकरी बहु. सर्व. सह.संस्था मर्या. वरठी
सातोना
ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत नोंदणी केलेली नसेल त्यांनी संबंधीत केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणेसह, चालु हंगामाचा पिकपेरा असलेला सातबारा उतारा, नमुना 8 अ, अद्यावत बँकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश, अद्यावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे घेवून तालुक्यातील जवळच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी पुर्ण करावी तसेच शेतकऱ्यांनी खरिप पणन हंगाम 2024-25 मध्ये धान विक्री करून शासकीय आधारभूत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एस. एस. पाटील जिल्हा पणन अधिकारी भंडारा या विभागानी कळविले आहे.