मतदार संक्षिप्त पुनरिक्षण   कार्यक्रमाकरीता विभागीय आयुक्त जिल्हा दौऱ्यावर

मतदार संक्षिप्त पुनरिक्षण   कार्यक्रमाकरीता विभागीय आयुक्त जिल्हा दौऱ्यावर

गडचिरोली, दि.15 : दिनांक 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून विभागीय आयुक्त   श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांना मतदार यादी निरीक्षक (Electoral Roll Observer) म्हणून नियुक्त केले आहे.

            मा.भारत निवडणूक आयोग यांचेकडून प्राप्त सुचनेनूसार दिनांक 01 जानेवारी 2024 अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या संपुर्ण  कालावधीत मा.मतदार यादी निरीक्षक यांना जिल्हा निहाय एकुण तिन भेटी द्यावयाच्या आहेत. त्यामध्ये दावे व हरकती निकाली काढण्याच्या कालावधीत दुसरी भेट द्यावयाची आहे.

            त्याअनुषंगाने मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी हे दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी गडचिरोली जिल्हयात दुसरी भेट देणार आहेत. सदरचे भेटी दरम्यान उक्त विषयाबाबत मतदार नोंदणी अधिकारी यांची दिनांक 18 डिसेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता सभा घेणार आहेत.