रब्बी २०२४ साठी एक रुपयात पिक विमा योजना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन

रब्बी २०२४ साठी एक रुपयात पिक विमा योजना

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन

गडचिरोली, दि.25: प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये घेतला आहे . गत वर्षी रब्बी २०२३ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यास आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून हि योजना राबविण्यात येत आहे . रब्बी २०२४ हंगामात पेरण्या सुरु झाल्या आहेत . शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाचे पिक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) सुरु करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपल्या पिकाचा विमा घ्यावा ,असे आवाहन करण्यात येत आहे .

योजनेतील वैशिष्ट पूर्ण बाबी

 विमा योजनेत समाविष्ट हरभरा, गहू, रब्बी ज्वारी , या ३ पिकांसाठी ,अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यना यात भाग घेता येईल.

 पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील.

 भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टल वर नोंदणीकृत भाडे करार उपलोड करणे आवश्यक आहे .

 ई-पीक पाहणी शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई पीक पाहणी मध्ये करावी .

 आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे उदा. शासकीय जमीन , अकृषक जमीन, कंपनी, संस्था,मंदिर ,मस्जिद यांची जमीन वर विमा काढल्यास त्याची अत्यंत गंभीर दाखल घेतली जाईल.

 या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा शेतात विमा घेतलेल पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल.

 या वर्षी हरभरा, गहू, रब्बी ज्वारी , पिकांमध्ये महसूल मंडल मधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रीमोट सेसिंग तंत्रज्ञान चा वापर करून येणाऱ्या उत्पादनास ४०% आणि पिक कापणी प्रयोग द्वारे आलेल्या उत्पादनास ६०% भारांकन देऊन येणारे उत्पादन नुसार महसूल मंडळ चे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे.

 अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे.

 पिक विम्यातील अर्ज हा आधार वरील नावा प्रमाणेच असावा .

 पिक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टल द्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता आपला बँक मॅनेजर माहिती देऊ शकतो.

 आधार कार्ड वरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे.

 विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास रुपये ४० मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे.ते संबंधित विमा कंपनी मार्फत सी. एस.सी विभागास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे रक्कम सीएससी चालकांना देणे अभिप्रेत आहे.

 योजना कार्यान्वयीन यंत्रणा

 रब्बी हंगाम २०२४ करीता सदर योजना नमुद केलेल्या विमा कंपनी कडून सबंधित जिल्ह्यामध्ये राबविण्यात येईल.

अ.क्र. जिल्हा विमा कंपनी टोल फ्री क्रमांक

१. गडचिरोली रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि. १८००१०२४०८८

 विमा संरक्षणाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत

 पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट

 पिक पेरणीपूर्व लावणिपूर्ण नुकसान

 हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान .

 काढणी पश्चात पिकाचे नुकसान.

 स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान

 विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्याने काय करावे .

 बिगर कर्जदार शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळणेस्तव विहित मुदतीपुर्वी नजीकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रासह विमा प्रस्ताव सादर करावा.

 कर्जदार शेतक-यांना योजनेत सहभागी होण्याचा/ न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकरी योजनेत सहभाग नोंदविण्यास इच्छुक नसेल तर तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदरपर्यंत देणे आवश्यक आहे. योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवस अगोदर शेतक-यांचे घोषणापत्र प्राप्त झाल्यास कर्जदार शेतक-यांना पुढील हंगामाकरिता योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल.

 विमा योजनेमध्ये विविध जोखिमीअंतर्गत निश्चित होणारे नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेच्या अटी व शर्तीच्या अधिन राहुन निश्चित केले जाते. हंगामात घेण्यात आलेल्या पिक कापणी प्रयोगातुन प्राप्त होणा-या सरासरी उत्पन्नाची तुलना ही उंबरठा उत्पन्नाशी करून हंगामाच्या शेवटी नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते.

 या योजनेत सहभागी होण्याकरिता ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करण्यात यावी.विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल.

 योजनेत सहभागासाठी अंतीम मुदत:

अ.क्र. पिक अंतिम तारीख

१ हरभरा १५/१२/२०२४

२ गहू १५/१२/२०२४

३ रब्बी ज्वारी ३०/११/२०२४

४ भात (उन्हाळी ) ३१/०३/२०२४

 सर्वसाधारण पिक निहाय विमा संरक्षित रक्कम ,यात जिल्हानिहाय फरक संभवतो.

अ.क्र. पिक विमा संरक्षित रक्कम रु/हे.

१ हरभरा ३८०००

२ गहू २७५००

३ रब्बी ज्वारी २२५००

 अधिसूचीत केलेली पिके

तालुका पिक

अहेरी ज्वारी

आरमोरी हरभरा

आरमोरी भात (उन्हाळी )

आरमोरी ज्वारी

चामोर्शी ज्वारी

वडसा भात (उन्हाळी )

गडचिरोली ज्वारी

कोरची हरभरा

कुरखेडा हरभरा

कुरखेडा भात (उन्हाळी )

कुरखेडा गहू

मुलचेरा ज्वारी

सिरोंचा भात (उन्हाळी )

सिरोंचा ज्वारी

योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन १४४४७ , संबंधित विमा कंपनी , स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली प्रिती हिरळकर यांनी कळविले आहे.