जिल्हयात दिनांक 25 नोव्हेंबर 2024 ते 28 फेब्रुवरी 2025 या कालावधीत पशुगणना होणार
100 कर्मचारी करणार नोंदणी
गडचिरोली,दि.25:जिल्हयात 21 व्या पशुगणना दिनांक 25 नोव्हेंबर 2024 पासुन सुरुवात होत असुन दिनांक 28 फेब्रुवरी 2025 पर्यंत चालणार आहे. त्यासाठी जिल्हयात 82 प्रगणक व 18 पर्यवेक्षकाची असे एकुण 100 कर्मचाऱ्याची नेमणुक करण्यात आली आहे. पशुगणनेसाठी नागरी भागाकरीता प्रति 4000 कुटूंबामागे 1 प्रगणक व 10 प्रगणकामागे 1 पर्यवेक्षक तर ग्रामिण भागाकरीता प्रति 3000 कुटूंबामागे 1 प्रगणक व प्रति प्रगणकामागे 1 पर्यवेक्षक याप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे.
21 वी पशुगणना हि प्रथमच ऑनलाईन अर्थात ॲपव्दारे करण्यात येणार आहे. पशुगणननेमुळे जिल्हयातील पशुधनाची संख्या निर्धारीत होऊन त्यानुसार राज्य सरकारला धोरण आखता येईल.
तसेच योजनामध्ये सुसत्रता आणण्यासाठी याचा फायदा होणार आहे. यामध्ये जिल्हयातील नागरी व ग्रामिण भागात पशुधनाच्या जाती व कुक्कुटपक्षी यांची प्रजातीनिहाय वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे.
या मोहिमेत गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कूट यांची गणना केली जाणार आहे. या पशुगणनेच्या अनुसार शासनाकडुन धोरण, योजना आखल्या जातात व त्यानुसार निधीची उपलब्धता केली जाते. शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे त्यानुसार लसीकरण, औषधाचा पुरवठा केला जातो. गोळा होणारी माहिती हि शासकीय योजनासहित महत्वाची ठरणार असल्याने आपल्याकडील जनावराची खरी माहिती पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना जिल्हयातील सर्व नागरीकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबतचे आवाहन मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.