जिल्हा परिषदेच्या आकर्षक मतदान केंद्रावर पार पडले मतदान

जिल्हा परिषदेच्या आकर्षक मतदान केंद्रावर पार पडले मतदान

चंद्रपूर, दि. 19 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर तर्फे स्वीप मोहीम राबविण्यात येऊन 19 एप्रिल रोजी झालेल्या मतदानप्रसंगी जिल्हा परिषदेतील 9 मतदार केंद्र आकर्षक स्वरूपात सजविण्यात आले होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार 19 एप्रिल रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation) अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे सामान्य प्रशासन विभाग – 2, बांधकाम विभाग – 2, उपविभाग बांधकाम – 2 समाजकल्याण विभाग – 2, व सिंचाई विभाग – 1 अशी एकूण 9 मतदान केंद्रे आकर्षक सजावटीने सजविण्यात आली होती.

या मतदान केंद्रांना आकर्षक स्वरूप देतांना जिल्हा परिषदेद्वारे परिसरात विविध आकारातील रंगीत फुगे लावण्यात आले. मुख्य द्वाराला सजविण्यात येऊन मतदानास येणाऱ्या मतदारांचे स्वागत करण्यात येत होते. मतदानाचा टक्का वाढीचा संदेश देणारे घोषवाक्य परिसरात लावण्यात येऊन सेल्फी पॉईंट दर्शनी भागात ठेवण्यात आले होते. उन्हापासून त्रास होवू नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रासमोर मंडप उभारण्यात आले. त्याचप्रमाणे मतदारांसाठी थंड पाण्याचीही सोय करण्यात आली होती. मतदारांना त्यांचे नाव शोधण्यास अडचण उद्भवू नये म्हणुन बीएलओ व मतदान केंद्रावरील कर्मचारी वर्गाने मतदारांना पूर्ण सहकार्य केले व मतदान यशस्वीरीत्या पार पाडण्यात महत्वाची भुमिका बजावली.