निवडणूक निरीक्षक राहुल कुमार यांचेकडून आमगाव विधानसभा मतदार संघातील निवडणूक व्यवस्थेची पाहणी

निवडणूक निरीक्षक राहुल कुमार यांचेकडून आमगाव विधानसभा मतदार संघातील निवडणूक व्यवस्थेची पाहणी

गडचिरोली दि. 11 : 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक श्री राहुल कुमार यांनी गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचेसमवेत आज आमगाव विधानसभा मतदार संघात भेट देवून निवडणूक व्यवस्थेची पाहणी केली.
श्री राहुल कुमार यांनी आमगांव विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रुमला भेट दिली. त्यांनी इव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचे सिलींग व अभिरूप मतदान (मॉक पोल) कामाची पहाणी केली. तसेच पहाणीचे
वेळी उपस्थित अधिकारी / कर्मचारी यांना निवडणुक कामाबाबत आवश्यक त्या महत्वाच्या सुचना दिल्या.
यावेळी सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, तहसिलदार डॉ. रविंद्र होळी आमगांव, तहसिलदार श्री संतोष महाले देवरी, तहसिलदार श्री नरसय्या
कोंडागुर्ले सालेकसा तसेच श्रीमती माधुरी टेकाडे अप्पर तहसिलदार चिचगड व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.