एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या.

एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या.

दिनांक ३१/०३/२०२४ रोजी फिर्यादी नामे पोउपनि अतुल कावळे, पोलीस स्टेशन, रामनगर यांनी पोस्टला तकार दिली की, दिनांक २८/०३/२०२४ रोजी नाईट डयुटी ऑफिसर म्हणुन डयुटीवर हजर असतांना नियंत्रण कक्ष येथुन माहिती मिळाली की, बंगाली कॅम्प चौक, दुर्गा माता मंदिर जवळील बँक ऑफ इंडियाचे ए.टि.एम. मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला अशा माहिती वरून बँक ऑफ इंडिया, बंगाली कॅम्पचे ए.टि.एम मध्ये जावुन पाहीले असता, ए.टि.एम. मधुन जोर-जोराने सायरनचा आवाज येत असल्याचे तसेच ए.टि.एम. मधील सीसीटिव्ही. कॅमे-यावर स्प्रे मारून कॅमे-याचे वायर तोडल्याचे दिसुन आले. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, रामनगर येथे अप.क. अप.क. ३६४/२०२४ कलम ३७९, ५११ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे..

नमुद गुन्हयाचे तपासा दररम्यान अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गाडे, यांनी तात्काळ गुन्हे शोध पथक येथील अधिकारी तसेच कर्मचारीसह घटनास्थळी रवाना झाले. गुन्हे शोध पथकानी तात्काळ तांत्रिक कौशल्याचा वापर केले असता, एका काळया रंगाच्या थार मध्ये काही अज्ञात इसम ए. टि.एम. मधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसुन आले. तेव्हा मा. पोलीस अधिक्षक सा., अपर पोलीस अधिक्षक सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सा. यांचे मार्गदर्शनात पोउपनि मधुकर सामलवार तसेच कर्मचारी यांचे पथक तयार करून अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे कामी रवाना केले. त्यावरून पोउपनि सामलवार सा. यांचे पथक तांत्रिक कौशल्याचा वापर करून काळया रंगाच्या थार गाडीचा पाठलाग करीत टोल नाके चेक करीत नागपुर, हैद्राबाद येथे जावुन थार गाडी व आरोपीतांचा शोध घेत आरोपी नामे हुसेन अली वय २१ वर्ष, रा. पटेलवाडा, आमीरपेठ, हैद्राबाद यास ताब्यात घेवुन विचारपुस केले असता, त्यांने १) मो. आमीर उर्फ अरमान मलीक रा. हैद्राबाद, २) तस्सी उर्फ तस्लीम उदय खान, वय-२६ वर्ष, रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात, राज्य हरियाणा, ३) राशीद खान, रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात, राज्य- हरियाणा, ४) सल्ली उर्फ सलमान रा. भोंड, ता. फिरोजपुर, जि. मेवात यांचेसह ए.टि.एम. फोडन्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितल्याने मो. आमीर उर्फ अरमान मलीक रा. हैद्राबाद याचा हैद्राबाद येथे शोध घेतला असता मिळुन आला नाही. उर्वरीत आरोपीतांचा शोध घेणे कामी दिल्ली व हरीयाणा राज्यात गुरूग्राम, मेवात, फिरोजपुर येथे जावुन आरोपी राशीद खान, आरोपी सल्ली उर्फ सलमान आरोपीतांचा शोध घेतला असता, नमुद आरोपी मिळुन आले नाही. गुन्हयातील आरोपी नामे तस्सी उर्फ तस्लीम उदय खान, वय-२६ वर्ष, रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात याचा शोध घेत असतांना गुरूग्राम येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.

नमुद गुन्हयातील आरोपीतांचा पोलीस कस्टडी रिमांड घेवुन गुन्हयात वापरलेली काळया रंगाची थार गाडी हैद्राबाद येथुन किरायाने घेवुन वेगवेगळया नंबर प्लेटचा वापर करून ए.टि.एम. मशिन तोडुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केले असे सांगितले त्यावरून नमुद वाहन आरोपीकडुन एक काळया रंगाची थार गाडी कमांक टि.एस. ३१ जे. २२९९ जप्त केली तसेच अधिक विचारपुस केले असता, त्यांनी यापुर्वी जिल्हा- चंद्रपुर येथील पोलीस स्टेशन वरोरा तसेच नागपुर जिल्हयातील विविध ठिकाणी ४ ए.टि.एम. मशिन तोडुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न तसेच एका ठिकाणातील मोबाईल शॉपी फोडल्याचे सांगत असुन अधिक तपास सुरू आहे.

पोस्टे रामनगर अप.क. ३६४/२०२३ कलम ३७९, ५११, ३४ भादंवि

घटनास्थल बंगाली कॅम्प चौक, बँक ऑफ इंडिया ए. टि. एम. चंद्रपूर

आरोपीचे नाव :

१) हुसेन अली वय २१ वर्ष, रा. पटेल वाडा, आमीरपेठ, हैद्राबाद

हरियाणा

२) तस्सी उर्फ ​​तस्लीम उदय खान, वय-२६ वर्ष, रा. सिरोली, ता. पुना जि. मेवात,

जप्त माल :- १) एक काळया रंगाची थार गाडी कमांक टि.एस. ३१ जे. २२९९ किमंत १४,०००००/- न २) एक काळया रंगाची स्प्रे बॉटल किमंत २००/- रु.

गुन्हे शोध पथक येथिल अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा व गुन्हयात वापरलेल्या काळया रंगाच्या थार गाडीचा शोध घेणे कामी अतिशय परिश्रम घेवुन तांत्रिक पध्दतीने कौशल्यापुर्ण तपास करून आरोपीतांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आले.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, श्री. सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गाडे, पो.नि. यशवंत कमद तसेच गुन्हे शोध पथक, रामनगर सपोनि देविदास नरोटे, पोउपनि, मधुकर सामलवार, पोउपनि दिपेश ठाकरे, पोहवा/०९ सिडाम, पोहवा /२२९६ रजनिकांत, पोहवा/११७६ किशोर, पोहवा /२२७३ शरद, पोहवा/५३२ सतिश, पोहवा/११६५ आनंद, पोहवा/२४५४ प्रशांत, नापोशि/२४३० लालु, पोशि/८२५ हिरालाल, पोशि/८४७ रविकुमार, पोशि/८८७ प्रफुल, पोशि/८८१ संदिप, पोशि/२५१३ विकास, पोशि/६९९ विकास जाधव, पोशि/१२३० पंकज, मपोहवा/४६२ मोरे पोलीस स्टेशन, रामनगर तसेच सायबर पोस्टे, चंद्रपुर येथील नापोशि/छगन, पोशि/वैभव, पोशि/ भास्कर, पोशि/राहुल, पोशि/उमेश सहकार्याने कार्यवाही केली आहे.