हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीमेची केंद्रीय चमुकडून पाहणी

हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीमेची केंद्रीय चमुकडून पाहणी

 

गडचिरोली, दि.14: राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची दिनांक 10 फेब्रुवारी 2023 पासून गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व आरमोरी या दोन तालुक्यात सुरुवात झालेली आहे. या मोहिमेची पर्यवेक्षण करण्याकरता राज्यस्तरावरून विभागीय संचालक,पुणे, डॉ. अनिल अलोणे यांनी मोहिमेची पाहणी केली.

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व आरमोरी तालुक्यात हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची दिनांक 10 फेब्रुवारी 2023 पासून सुरुवात झाली असून याचाच एक भाग म्हणून विभागीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण, भारत सरकार,आकुर्डी पुणे कार्यालयाचे विभागीय संचालक डॉ. अनिल अलोणे व त्यांच्या चमूणे चामोर्शी व आरमोरी तालुक्यातील विविध आरोग्य संस्थांना भेटी देऊन पाहणी केली.

प्राथमिक आरोग्य केंद्र, कुनघाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, भेंडाळा अंतर्गत मार्कंडा गावातील काही घरांना भेटी देऊन हत्तीरोगावरील औषधी त्या घरातील व्यक्तीने सेवन केली किंवा नाही याची पाहणी करून औषधी सेवन न केलेल्या व्यक्तीना समुपदेशन करून औषधी खाऊ घातली व हत्तीरोग होऊ नये म्हणून मार्गदर्शन केले.

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, वडधा उपकेंद्र चुरचुरा, प्राथमिक आरोग्य पथक देऊळगाव येथे सुद्धा पाहणी केली. यादरम्यान दोन्ही गावातील भेट दिलेल्या व ज्या घरातील सदस्यांनी औषधी घेतली नाही, त्यांना समक्ष औषधी घेण्यास मार्गदर्शन केले तसेच अनेक व्यक्तींनी जेवण केलेले नव्हते तथा काही मजूर शेतीच्या कामावर गेले असल्याने अशांना रात्री जेवणानंतर औषधी देण्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

एकदा हातीरोग झाला की, बरा होत नाही तेव्हा हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीमेतील मधील तीनही औषधी गोळ्यांचे सेवन करणे आवश्यक असून त्यामुळे भविष्यात हत्तीरोग होणार नाही म्हणून औषधी खाऊ घालणारे कर्मचारी व गावातील लोकांनी समक्ष औषधी गोळ्यांचे सेवन करण्याकरता मार्गदर्शन केले. या भेटीत वरिष्ठ विभागीय संचालक आरोग्य व कुटुंब कल्याण, भारत सरकार, पुणे येथील डॉ. सरिता सपकाळ, मुख्य वैद्यकीय अधिकारी, बि. आर. माने, हत्तीरोग सल्लागार, महेंद्र सोनार, कीटक शास्त्रज्ञ तसेच जिल्हा हिवताप कार्यालयाचे कालिदास राऊत, आरोग्य सहाय्यक हजर होते.