गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात 24 हजार नवमतदार

गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात 24 हजार नवमतदार

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १८ ते १९ वयोगटातील २४ हजार २६ नवमतदारांनी नोंदणी केली आहे यात १३ हजार २६१ पुरुष तर १० हजार ७६४ महिलांचा समावेश आहे.
१२-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघातील आमगाव , आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रम्हपुरी आणि चिमुर हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघातील १८ ते १९ वयोगटाच्या नवमतदारांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. आमगाव -१७१५ पुरुष आणि १३६५ महिला, एकूण ३०८०, आरमोरी-१८४८ पुरुष आणि १५४४ महिला एकूण ३३९२, गडचिरोली २७८४ पुरुष आणि २२८७ महिला एकूण ५०७१, अहेरी – २१०२ पुरुष आणि १५०९ महिला व एक तृतियपंथी असे एकूण ३६१२, ब्रम्हपुरी – २४५८ पुरुष आणि २०२३ महिला एकूण ४४८१, चिमुर – २३५४ पुरुष आणि २०३६ महिला एकूण ४३९० मतदारांनी नोंदणी केली आहे.