निवडणूक प्रक्रियेदरम्यान माहितीकरीता विविध ॲप उपलब्ध

निवडणूक प्रक्रियेदरम्यान माहितीकरीता विविध ॲप उपलब्ध

चंद्रपूर, दि. ་5 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात आदर्शआचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक कालावधीत जर आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना आता निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने C-Vigil App (सतर्कता मोबाईल ॲप ) विकसित केले असून यावर तक्रार करण्यास हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे मतदानाची टक्केवारी पाहण्याकरिता Voter Turn Out app, मतदारांच्या मदतीकरिता Voter help link व Saksham App., मतदारांना आपल्या उमेदवारांची संपूर्ण माहिती मिळण्याकरिता Know Your Candidate App तसेच मतदारांसंबंधी माहितीकरिता Voter portal App तयार करण्यात आले आहे. 13-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ ( ७१ चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र ) अंतर्गत मतदारांनी मा.निवडणूक आयोग यांनी तयार केलेल्या या विविध प्रणालींचा वापर करण्यास हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्याचे आवाहन सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.

सी-व्हीजील ॲपचा वापर कसा करावा : अँड्रॉईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर आणि आयफोनमधील ॲप स्टोअर या ॲपमध्ये जाऊन सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करा. त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करून खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडीओसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा, असे कळविण्यात आले आहे.