निवडणूक निरीक्षक पराशर यांची आरमोरी विधानसभा मतदार क्षेत्राला भेट

निवडणूक निरीक्षक पराशर यांची
आरमोरी विधानसभा मतदार क्षेत्राला भेट

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक अनीमेष कुमार पराशर यांनी काल आरमोरी विधानसभा मतदार संघात भेट देवून निवडणूक व्यवस्थेच्या तयारीची पाहणी केली.
12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल रोजी होत आहे. याअंतर्गत आरमोरी विधानसभा मतदार संघातील देसाईगंज तालुक्यातील मतदान केंद्राची श्री पराशर यांनी पाहणी केली. तसेच तहसिल कार्यालय, देसाईगंज येथील स्ट्रॉंग रूमला भेट देवून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती मानसी, तहसिलदार प्रिती, डुडुलकर, तहसीलदार प्रशांत गड्डम (कोरची) तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.