गोवर्धन गोवंश सेवा योजनेकरीता प्रस्ताव आमंत्रित

गोवर्धन गोवंश सेवा योजनेकरीता प्रस्ताव आमंत्रित

 

भंडारा, दि. 21 : सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेअंतर्गत यापूर्वी अनुदान प्राप्त झालेले तालुके वगळून (लाखनी) प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येकी एक या प्रमाणे पात्र गौशाळाकडून अर्ज प्राप्त होत आहे. या पूर्वी योजने अंतर्गत सादर करण्यात आलेले प्रस्ताव ग्राह्य धरली जाणार नाहीत. तरी इच्छुक संस्थानी विहित नमुन्यात नव्याने अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. अर्ज 19 जून ते 19 जुलै 2023 पर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त भंडारा यांच्या कार्यालयात सादर करावे. अर्जाचा नमुना व इतर माहिती करिता उपआयुक्त पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधता.