12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही.

12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात
पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही

आज चार व्यक्तींनी एकूण 14 नामनिर्देशन अर्ज नेले आहे.

गडचिरोली, दि.20: सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत 12- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 27 मार्च 2024 आहे.