आनंदाचा शिधा वाटपात जिल्हा राज्यात तिसरा तर नागपूर विभागात प्रथम

आनंदाचा शिधा वाटपात जिल्हा राज्यात तिसरा तर नागपूर विभागात प्रथम

          भंडारा, दि. 5 :आंनदाचा शिधा वाटपात भंडारा जिल्हा राज्यात तिस-या तर नागपूर विभागात प्रथम क्रमांकावर आहे. पात्र शिधापत्रिकाधारकांपैकी  आतापर्यंत आनंदाचा शिधा 2 लाख 32 हजार 987 लाभार्थ्यांपैकी 2 लाख 30 हजार 352 पात्र लाभार्थ्याना हा शिधा वाटप  करण्यात आला आहे. वितरणाचे प्रमाण 98.87 टक्के आहे.राज्यात  सातारा,कोल्हापूर या जिल्हयानंतर भंडारा जिल्हयाने आनंदाच्या शिधा वाटपात आघाडी घेतली आहे.

         तर विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. स्वस्त धान्य दुकानांमधून फक्त 100 रुपयांत चार वस्तूंचा समावेश असलेल्या आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यात येत आहे. या चार वस्तूंमध्ये 1 किलो रवा, 1 किलो हरभरा डाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल आदींचा समावेश असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी  सांगितले. या शिधा वाटपाच्या वितरणाबाबत कोणतीही तक्रार असल्यास जवळच्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. वंजारी यांनी केले आहे. भंडारा जिल्हयात एकुण 889 स्वत धान्य दुकांनाव्दारे आनंदाचा शिधा वाटप सुरू आहे.त्यामध्ये भंडारा तालुक्यात 98.40 ,लाखांदूर 99.08, लाखनी 99.91, मोहाडी 98.98 ,पवनी 98.69 साकेाली 99.54,तुमसर 98.33  इतके वाटपाचे प्रमाण आहे.