“मेरी मिट्टी मेरा देश” अभियानातंर्गत शिलाफलकाचे काम प्रगतिपथावर

मेरी मिट्टी मेरा देश अभियानातंर्गत शिलाफलकाचे काम प्रगतिपथावर

चंद्रपुर, दि.9 : शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत विविध कार्यक्रम हाती घेतले आहे. त्यानुसार, संपूर्ण देशात व राज्यात “मेरी मिट्टी मेरा देश” (मिट्टी को नमन वीरो को वंदन) अभियान राबविण्याच्या सूचना शासनस्तरावर देण्यात आल्या आहे.

त्याअनुषंगाने, जिल्ह्यात एकूण 825 ग्रामपंचायत कार्यरत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत आदी ठिकाणी शिलाफलकाच्या कामास सुरुवात करण्यात आली असून 50 टक्के ग्रामपंचायतीमध्ये शिलाफलकाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 50 टक्के शिलाफलकाचे काम 4 ते 5 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. सदर शिलाफलकावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा लोगो, ग्रामपंचायतीचे नाव/शहराचे नाव, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी, सुरक्षेसाठी बलिदान दिले, अशा थोर व्यक्तींची नावे शिलाफलकावर नमूद करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे यांनी कळविले आहे.