जिल्हाधिकारी संजय दैने यांनी पदभार स्विकारला

जिल्हाधिकारी संजय दैने यांनी पदभार स्विकारला

गडचिरोली, दि.14: गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून श्री संजय दैने यांनी काल सायंकाळी (दि.१३ मार्च) पदभार स्विकारला. यापूर्वी ते हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. मावळते जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या जागी ते रूजू झाले आहेत.
जिल्हाधिकारी दैने यांनी यापूर्वी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा तसेच नागपूर येथे विविध पदांवर काम केले आहे.