तरुण वयात हार्ट अटॅक कसा टाळावा, जाणून घेऊया तज्ञांच्या मते, इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे जनजागृती पर कार्यक्रम

तरुण वयात हार्ट अटॅक कसा टाळावा
जाणून घेऊया तज्ञांच्या मते
इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे जनजागृती पर कार्यक्रम

चंद्रपूर  …..
आज काल तरुण वयामध्ये हृदय रोगाचे प्रमाण वाढत चाललेले असून, यामध्ये तरुणांना हार्ट अटॅक येऊन मृत्यूचे प्रमाण अधिक होत आहे, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे  प्रख्यात *गायक के के व अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचा हृदयरोगाने तरुण वयात झालेला मृत्यू हे होय

विश्वसुंदरी व प्रख्यात अभिनेत्री सुश्मिता सेन, श्रेयस तळपदे हे देखील हृदयरोगाने ग्रस्त आहेत.
हे हृदयरोग कसे टाळावे यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर तर्फे जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक 16 मार्च 2024 रोजी प्रियदर्शनी सभागृह येथे ठीक 4 वाजता आयोजित करण्यात आलेले आहे.
चंद्रपूरचे प्रसिद्ध कर्डिओलॉजिस्ट  तज्ञ डॉ. रोहन आईंचवार, डॉ. स्वप्निल पुणेकर, डॉ. वरघणे यांच्या मार्गदर्शनात व माजी IMA अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत  लाभणार आहे.
या जनजागृती कार्यक्रमास सर्व चंद्रपूरकरांनी उपस्थित राहून यथायोग्य लाभ घेण्याचे आवाहन IMA च्या अध्यक्षा  डॉ. कीर्ती साने, सचिव डॉ. कल्पना गुलवाडे, कोषाध्यक्ष  डॉ. अपर्णा देवईकर, प्रकल्प निर्देशिका  डॉ. नसरीन मवानी, डॉ. वृषाली बोडगुलवार, डॉ. समृद्धी आईचवार यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.