जिल्ह्यातील आरोग्य संस्थेत कॅन्सर निदान शिवीर आयोजन

जिल्ह्यातील आरोग्य संस्थेत कॅन्सर निदान शिवीर आयोजन

            भंडारा,दि.13 : जिल्हा आरोग्य विभाग भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यात कर्करोग शिबीर आयोजित करावयाचे आहेत. यामध्ये भंडारा जिल्हयातील आरोग्य केंद्र,व इतर केंद्राची शिबीर 13 ते 30 मार्च,2024 पर्यत  प्राथमिक आरोग्य केंद्र,तसेच ग्रामीण रूग्णालय या कालावधी मध्ये शिबीर आयोजित करण्यात आली आहे.

          तसेच 01ते  16एप्रिल 2024 याप्रमाणे आरोग्य शिविरे आयोजित करावयाचे आहेत .हि आरोग्य शिबिर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल व नॅशनल कैंसर हॉस्पिटल नागपूर यांच्या तर्फे घेण्यात येणार आहेत ह्या शिबिरात मुख, स्तन, गर्भाशय व इतर कर्करोगाचे तपासणी व निदान करण्यात येणार आहे.