जागृती अॅग्रो फुट्स इंडीया अॅन्ड इंफ्रा प्रा. लि. ने फसवणूक केलेल्या…

जागृती अॅग्रो फुट्स इंडीया अॅन्ड इंफ्रा प्रा. लि. ने फसवणूक केलेल्या…

सविनय सादर आहे, यातील फिर्यादी नामे जिमल अहमद खलील अहमद मन्सुरी वय ५५ वर्ष, जात मुस्लीम धंदा शेती रा. गुरुनानक नगर तुमसर ता. तुमसर जि. भंडारा इतर १२ यांचे तर्फे लेखी रिपोर्ट वरुन जागृती अॅग्रो फुट्स इंडीया अॅन्ड इंफ्रा प्रा.लि. रजि क्र. AAC-२७७८ दिनाकं २८ एप्रिल २०१४ स्थापन करुन कंपनीचे डॉयरेक्टर १) जाई राज गायकवाड (२) राज गणपत गायकवाड (३) भास्कर गायकवाड (४) शब्बीर याकुब शेख सर्व रा. सांगली यांनी संगणमत करुन सांगली येथे सेमिनार घेवुन शेळी पालन उद्योगात आमचे योग्यतेनुसार नोकरी देण्याचे आमिष देवुन कंपनीचे बँच ऑफीस चंद्रपुर येथे फिर्यादी कडुन १०,०५,०००/रुपये व इतर गुंतवणूकदाराकडुन नगदी रक्कम व शेळया घेवुन एकुण २८,००,०००/रुपयाची फसवणुक केली. अश्या फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरुन पोलीस ठाणे रामनगर अप क्र. ८१९/२०१६ कलम ४२०, ३४ भादवी सहकलम ३ एम पी आय

डी अॅक्ट १९९९ अन्वये गुन्हा नोंद असुन सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपुर करीत आहे. सदर गुन्हयातील जागृती अॅग्रो फुट्स इंडीया प्रा.लि. कंपनी आणी इंन्फाचे संचालक आरोपी क्र. १ ते ४

यांनी कंपनीत जर १ बकरी किंवा ५०००/रुपये तर १४ महीन्यात त्याच बकरी पासुन तयार झालेले १० किलोचे बकरीचे पिल्लु किवा ४०००/रुपये मिळतील असे बकरीचे पिल्लु किंवा ४०००/रुपये तुम्हाला ५ वेळा मिळतील हिच जर गुंतवणूक ७० महीन्यासाठी केली तर १० किलो वजनाचे १० बकरीचे पिल्लु किंवा ५०,०००/रुपये मिळतील जर तुम्ही २५ बकऱ्या किंवा १,२५,०००/रुपये भरले तर तुम्हाला १४ महीन्यानी २० बकऱ्या किंवा १,००,०००/रुपये मिळतील अश्या प्रकारे तुम्हाला १४- १४ महीन्यानी ५ वेळा पैसे मिळतील, हिच जर गुंतवणूक ७० महीन्यासाठी केली तर १० किलो वजनाचे २५० बकरीचे पिल्लु किंवा १२,५०,०००/रुपये मिळतील असे सांगीतले. व कंपनीत तुम्हाला नोकरी सुध्दा मिळेल तुम्ही कंपनीमध्ये पार्टनर जुळवला तर तुम्हाला २० टक्के कमीशन मिळेल असे सांगुन गुंतवणूकदार यांचे कडुन आरोपीतांनी पैसे घेवुन त्यांना कंपनीने सांगीतले प्रमाणे पैश्याचा परतावा न करता ७,६३,५०,०००/-रुपयाची फसवणूक केली आहे.

तरी जागृती अॅग्रो फुट्स इंडीया प्रा.लि. कंपनी आणी इंन्फ्रा मध्ये ज्या गुंतवणूकदाराची फसवणूक झालेली आहे अशा गुतवणूकदाराच्या रक्कमेच्या याद्या तयार करणे सुरू आहेत. तरी ज्या गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळाली नाही अशा गुंतवणूकदारानी गुंतवणूकीचे कागदपत्र (गुंतवणूकचे सर्टीफिकेट, रक्कम जमा पावत्या, आधार कार्ड, पॅन कार्ड ज्या खात्यावर पैसे पाहीजे त्या राष्ट्रीयकृत बँक खात्याचे पासबुकची झेरॉक्स प्रत) इ. माहीतीसह महाराष्ट्र शासन परीपत्रक क्रमांक एम पी आय /प्र.क्र. ०९/पोल-११ दिनांक २५/०२/२०१९ अन्वये गुंतवणूकदाराचे परीशिष्ठ- १ प्रमाणे फार्म भरुन देणे करीता आर्थिक गुन्हे शाखा, (पोलीस ठाणे दुर्गापुर परिसर) पोलीस अधिक्षक कार्यालय चंद्रपुर येथे यावे.