मार्कंडेश्वर मंदिराच्या कामाला सुरूवात / दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान- खा.अशोक नेते प.पुज्य मुरलीधर महाराज यांना निंबूपाणी पाजून उपोषणाची सांगता.

मार्कंडेश्वर मंदिराच्या कामाला सुरूवात / दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान- खा.अशोक नेते

प.पुज्य मुरलीधर महाराज यांना निंबूपाणी पाजून उपोषणाची सांगता.

गडचिरोली : मार्कंडेश्वरावर मनोभावे श्रद्धा असणाऱ्या लाखो भाविकांमध्ये मार्कंडा मंदिर हे पुरातन एक पवित्र श्रद्धा स्थान असून मी सुद्धा एक महादेवाचा भक्त आहे. त्यामुळे या मंदिराचा लवकरात लवकर जिर्णोद्धार पूर्ण व्हावा यासाठी माझा दिल्लीत पुरातत्व विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. कोणत्याही परिस्थितीत महाशिवरात्रीपूर्वी हे काम सुरू करा, अशी तंबीच मी संबंधित अधिकाऱ्यांना दिली होती. अखेर १ मार्चला हे काम पुन्हा सुरू होणार असा शब्द मी दोन आठवड्यापूर्वी मी दिला आणि आज तो शब्द पूर्ण केल्याचे समाधान मला आहे, अशी भावना खासदार अशोक नेते यांनी मार्कंडेश्वर मंदिरातील सोहळ्यात व्यक्त केली. प्रचंड उत्साहाच्या भजन दिंडीसह आणि मंगलमय वातावरणात आज शुक्रवारी (दि.१ मार्च) जिर्णोद्धाराच्या कामाला पुन्हा सुरूवात करण्यात आली.

या सोहळ्यामुळे जिर्णोद्धाराचे काम मार्गी लागावे यासाठी उपोषणाला बसलेले मुरलीधर महाराज यांनी आपल्या उपोषणाची सांगता केली. खा.अशोक नेते यांनी त्यांना लिंबूपाणी दिले. यावेळी मार्कंडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात पुजाअर्चा करण्यात आली. अनेक वर्षानंतर या कामाला सुरूवात होत असल्याने नागरिकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण होते.

मंदिराच्या बांधकामासोबत परिसरात नागरिकांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. पुरातत्व विभागाच्या परवानगीने ती कामेही लवकरच सुरू केली जातील, असा विश्वास यावेळी खा.नेते यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला सुनील शास्त्री महाराज, नागापुरे महाराज, पुरातत्व विभागाचे नागपूर विभागीय अधीक्षक अरुण मलिक, अतिरिक्त अधीक्षक आलोक त्रिपाठी, उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, तहसीलदार प्रशांत धोंडे, ठाणेदार विश्वास या अधिकाऱ्यांसह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, शहराध्यक्ष सोपान नैताम, जिल्हा सचिव दिलीप चलाख, प्रदेश कामगार आघाडीचे गोवर्धन चव्हाण,गजानन भांडेकर, संजय पंदीलवार, माणिक कोहळे, भास्कर बुरे, रेवनाथ कुसराम, नरेश अल्सावार, नामदेव सोनटक्के, साईनाथ बुरांडे, तसेच मोठ्या संख्येने भाविक व गावातील नागरिक उपस्थित होते.