महामंडळामार्फत प्रशिक्षण योजना सुरू

महामंडळामार्फत प्रशिक्षण योजना सुरू

गडचिरोली, दि.29: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.),गडचिरोली मार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील कुटुंबाची सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी व त्यांना रोजगार व स्वयंरोजगारांची साधणे उपलब्ध व्हावीत, म्हणुन समाजातील गरजुंना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना उपजिवीकेचे साधन उपलब्ध व्हावे व त्यांना ज्या व्यवसायाचे प्रशिक्षण पाहिजेत त्या व्यवसायाचे प्रशिक्षणा करीता मुख्यालयाकडुन सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता गडचिरोली जिल्ह्यासाठी १३३ प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण योजनेचे उद्दीष्टे प्राप्त झाले आहेत. त्याकरीता इच्छुक अर्जदारांनी महामंडळाच्या विहीत नमुन्यात अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आय.टी.आय च्या मागे, गडचिरोली येथे सादर करावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. अर्जासोबत लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

अर्जदाराचा जातीचा दाखला ( सक्षम अधिकारी त्यांचा कडुन घेतलेला असावा), अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न मर्यादा ३.०० लाखापर्यंत, तहसिलदार यांच्या कडुन घेतलेला असावा), नुकताच काढलेला पासपोर्ट साईझ फोटोच्या दोन प्रती जोडाव्यात, राशनकार्ड झेरॉक्स प्रती, आधारकार्ड झेरॉक्स प्रती/मतदान कार्ड/मोबाईल क्रमांक (आधारकार्ड लींक), अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, प्रशिक्षणार्थी मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील असावा, प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा, प्रशिक्षणार्थीचे वय १८ ते ५० वर्ष असावे, प्रशिक्षणार्थीने यापुर्वी शासनाच्या/महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा, एका कुटुंबातील एकाच व्यक्तिस सदर योजनेचा लाभ घेता येईल, प्रशिक्षणार्थिने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा. असे जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), गडचिरोली यांनी कळविले आहे.