कामाच्या ठिकाणी महीलांचा लैंगीक छळ कार्यशाळेत तज्ञ वक्तयांचे मार्गदर्शन कार्यशाळेत 75 हून अधिक अधिकारी-कर्मचा-यांचा सहभाग

कामाच्या ठिकाणी महीलांचा लैंगीक छळ कार्यशाळेत तज्ञ वक्तयांचे मार्गदर्शन कार्यशाळेत 75 हून अधिक अधिकारी-कर्मचा-यांचा सहभाग

           भंडारा- दि.22 : कामाच्या ठिकाणी महीलांचे लैगिंक छाळापासून संरक्षण प्रतिबंध, मनाई,व निवारण अधिनियम 2013 च्या तरतुदीची स्पष्ट माहिती देण्याकरीता आज जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यशाळेत 75 हून अधिक अधिकारी  व कर्मचा-यांनी सहभाग घेतला.

             सर्व शासकीय कार्यालयामध्ये गठीत अंतर्गत तक्रार समितीचे अध्यक्ष/सदस्यांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळ या समस्येची कारणे व स्वरुप याबाबत संवेदनशीलता वाढवण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे महिला व बालविकास अधिकारी तुषार पौनिकर यांनी सांगितले.

         या कार्यशाळेच्या उदघाटनाला सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बिजु गवारे,उपजिल्हाधिकारी लीना फलके,जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे तसेच पोलीस विभागाच्या उपनिरीक्षक श्रीमती बाबर उपस्थित होत्या.

          पुणे येथील कायदेविषयक सल्लागार पलव्वी थत्ते यांनी कामाच्या ठिकाणी महीलांचे लैगिंक छाळापासून संरक्षण प्रतिबंध,मनाई,व निवारण अधिनियम 2013 यातील सर्व तरतुदीची विस्तृत माहिती दिली.त्यांनतर उपस्थितांच्या प्रश्नांचे शंकानिरसण,विशाखा मार्गदर्शक तत्वे तसेच कायदयाची पार्श्वभुमी व कायदयाच्या तरतुदी तसेच शिक्षेचे प्रावधान,अंतर्गत समितीचे कार्य यावर सविस्तर प्रकाश टाकला.

          प्रा.नरेश आंबिलकर यांनी स्त्री पुरूष लिंगसमभाव यावर समानतेच्या दृष्ट्रीने प्रकाश टाकला.कामाच्या ठिकाणी महीलांचे लैगिंक छाळापासून संरक्षण प्रतिबंध,मनाई,व निवारण अधिनियम 2013 च्या अन्वये चौकशीची कार्यपध्दती यावर ॲङ मंजुषा गायधनी अध्यक्षा, स्थानिक तक्रार समिती  यानी मार्गदर्शन्‍ केले

         तर विधी सल्लागार अमिता खोब्रागडे  यांनी अंतर्गत तक्रार समितीचे अहवाल शासनास सादर करण्याची कार्यपध्दती सांगितली. या एकदिवसीय कार्यशाळेचे संचलन शुभांगी कोल्हे व आभार शिल्पा वंजारी यांनी केले.