क्षयरोगाचा औषधोपचार क्षयरुग्णांनी नियमित घ्यावा.

क्षयरोगाचा औषधोपचार क्षयरुग्णांनी नियमित घ्यावा.

शहापुर येथील औषध साठा मुदतबाह्य नाही.

            भंडारा दि.२१ :राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील उपचाराला संवेदनशील क्षयरुग्णांना सहा महिण्याकरीता औषधोपचार दिला जातो. क्षयरुग्णांनी नियमित औषधोपचार घेणे आजार बरा होण्यासाठी आवश्यक आहे सध्यास्थितीत फेब्रुवारी २०२४ मुदतवाढ्य असलेली औषधींचा पुरवठा झालेला आहे. सदर औषधी २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वापरता येतात, तरी मनात कोणतीही शंका न बाळगता क्षयरुग्णांनी फेब्रुवारी २०२४ पर्यंत मुदतबाहय असलेली औषधी २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वापरावी असे आवाहन डॉ. अमरदीप नंदेश्वर, जिल्हा क्षयरोग अधिकारी भंडारा यांनी आयुष्यमान आरोग्य मंदीर शहापुर येथे दिलेल्या भेटी दरम्यान केले. भेटी दरम्यान प्रा.आ. केंद स्तरावरील संपूर्ण औषधींची तपासणी करण्यात आलेली असुन सर्व औषधे वापरण्यास सुरक्षित असल्याची खात्री करण्यात आलेली आहे.