राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेला सुरुवात

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेला सुरुवात

गडचिरोली,13: राष्ट्रीय जंतनाशक मोहिम गडचिरोली जिल्हयात आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय जंतनाशक दिन दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता सावित्रीबाई फुले, नगर परिषद शाळा, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ, गोकुलनगर, गडचिरोली जिल्हा गडचिरोली येथे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, डॉ.दावल साळवे यांच्या हस्ते जिल्हा स्तरीय राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उदघाटन बालकास अल्बेंडाझोल (जंतनाशक) गोळी खाऊ घालून करण्यात आले.

या उदघाटनास अर्चना इंगोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) , डॉ.प्रफुल हुलके़, डॉ. अमित साळवे, डॉ.विनोद म्हशाखेत्री, डॉ.पंकज हेमके, डॉ. सिमा गेडाम, सी.डी.पी.ओ.गडचिरोली तसेच इतर शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, जिल्हा स्तरीय व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गोकुलनगर स्तरीय आरोग्य अधिकारी व कर्मचारी तसेच शाळेचे विदयार्थी व अंगणवाडीचे बालके उपस्थित होते.