भंडारा जिल्हा पोलीस दल आदर्श गणेश मंडळ स्पर्धा – २०२३ बक्षीस वितरण समारंभ

जिल्हा पोलीस दल आदर्श गणेश मंडळ स्पर्धा – २०२३ बक्षीस वितरण समारंभ

भंडारा :- दिनांक १३/१०/२०२३ रोजी पोलीस मिटींग हॉल येथे भंडारा जिल्हा पोलीस दलाचे वतीने आदर्श गणेश मंडळ स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक भंडारा मा. श्री. लोहित मतानी, उपाध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, पोलीस उपअधिक्षक (गृह) श्री. सचिन पवार, प्रमुख पाहुणे जे. एम. पटेल कॉलेज भंडारा प्राचार्य श्री. विकास ढोमणे, श्रीमती वडनेरकर सीडब्लु सी. भंडारा, श्री. ईश्वर लाल काबरा शितला माता मंदीर अध्यक्ष, परवेज पटेल जामा मज्जीद अध्यक्ष, शहगादा भाई मस्तानशाह मज्जीद सदस्य, संजय एकतापुरे विश्व हिंदू परीषद, भंडारा, मुक्ती महम्मद साजीद जीमयन ओलाना हिंद भंडारा अध्यक्ष सर्व उपस्थित पाहुण्यांचे समानचिन्ह देवून स्वागत समारभांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली.

आदर्श गणपती योजना या मागचा उद्देश म्हणजे ज्या गावाने आपल्या गणपती मंडळच्या वतीने एक व्यक्ती नेमावायचे होते. गणपती मंडळात नैसर्गीक देखावे, रक्तदान शिबीर, वृक्षारोपन डि. जे. मुक्त गणपती, ज्या गणपती मंडळाने स्त्री, पुरुष, व बालकांनी सहभाग होता असा गणपती म्हणजे आदर्श गणपती मानला गेला पोलीस स्टेशन स्तरावर प्रथम क्रमांक ५,०००/- रु. व्दितीय क्रमांक ३,०००/- रु. तृतीय कमांक २,०००/- रु. पोलीस स्टेशन भंडारा श्री. नव बजरंग गणेश उत्सव मंडळ बजरंग चौक भंडारा, प्रथम कमांक, व्दितीय क्रमांक भंडाराचा राजा प्रतिष्ठान लहान बाजार भंडारा, तृतीय क्रमांक विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळ सामान्य रुग्नालय भंडारा, पोलीस स्टेशन अंतर्गत प्रथम क्रमांक श्री. साई गणेश मंडळ किटाळी, व्दितीय क्रमांक ग्रामगिता सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मस्जित जवळ अडयाळ, तृतीय क्रमांक राजे ग्रुप सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ भाटपुरी वार्ड अड्याळ, पोलीस स्टेशन तुमसर अंतर्गत प्रथम कमांक सार्व. गणेश उत्सव मंडळ शिवाजी नगर तुमसर व्दितीय कमांक श्री. बजरंग गणेश उत्सव मंडळ श्रीराम नगर तुमसर, तृतीय क्रमांक सार्व. नविन विदर्भ बाल गणेश उत्सव मंडळ मालविय नगर तुमसर पोलीस स्टेशन आंधळगाव अंतर्गत प्रथम कमांक श्री. बाल गणेश उत्सव मंडळ रामपुर, व्दितीय क्रमांक सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ डोगरगाव, तृतीय क्रमांक शिवगर्जना गणेश उत्सव मंडळ आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत प्रथम कमांक एकता गणेश उत्सव मंडळ लाखोरी रोड संजय नगर, व्दितीय क्रमांक श्री. दत्त गणेश मंडळ उत्सव दत्तमंदीर रोड लाखनी, तृतीय क्रमांक बाल युवा गणेश उत्सव मंडळ वार्ड नं. ०४ नगरपंचायत पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत प्रथम क्रमांक नवप्रभात गणेश उत्सव मंडळ, कर्कापुर, व्दितीय श्री. बाल गणेश उत्सव मंडळ, चुल्हाड तृतीय कमांक श्री. बाल युवक गणेश मंडळ वाहणी, पोलीस स्टेशन दिघोरी अंतर्गत प्रथम क्रमांक गणरा मित्र मंडळ दिघोरी / मो. व्दितीय क्रमांक सार्वजनिक नवयुक गणेश मंडळ मुरमाडी, तृतीय क्रमांक बाल गणेश मंडळ

बोथली / जुनी पोलीस स्टेशन पवनी अंतर्गत प्रथम क्रमांक काशीचा राजा गणपती मंडळ प्रेम नगर तहसिलच्या मागे पवनी, व्दितीय नवयुक गणेश उत्सव मंडळ पवनी, तृतीय क्रमांक शेषनगर गणेश उत्सव मंडळ शेषनगर पवनी, पोलीस स्टेशन गोबरवाही अंतर्गत प्रथम क्रमांक सार्वजनिक श्री. बाल गणेश समिती सितासावंगी व्दितीय कमांक बाल गणेश उत्सव मंडळ ५२ कॉलोनी चिखला तृतीय क्रमांक गणेश पुजा उत्सव समिती राजापुर, पोलीस स्टेशन साकोली प्रथम क्रमांक आदर्श सार्व. गणेश मंडळ चिचटोला, व्दितीय क्रमांक सार्व. बालगणेश उत्सव मंडळ साकोली सिव्हील वार्ड, तृतीय क्रमांक एस टी कर्म. गणेश मंडळ साकोली, पोलीस स्टेशन कारधा अंतर्गत प्रथम क्रमांक सार्वजनिक नेहरु उत्सव मंडळ आमगाव व्दितीय क्रमांक श्री. बालमित्र गणेश उत्सव मंडळ मिलेवाडा तृतीय क्रमांक न्यू बाल गणेश मंडळ कोका, पोलीस स्टेशन जवाहरनगर अंतर्गत प्रथम क्रमांक श्री. बालगणेश उत्सव मंडळ पेट्रोलपंप ठाणा, व्दितीय क्रमांक अष्टविनायक गणेश मंडळ शहापुर तृतीय कमांक बाल गणेश उत्सव मंडळ साहुली, पोलीस स्टेशन लाखांदुर अंतर्गत प्रथम क्रमांक बाल गणेश उत्सव मंडळ रोहणी, व्दितीय क्रमांक नेहरु युवा बहुउदेशीय गणेश मंडळ पिंपळगाव / कोहळी, तृतीय क्रमांक सार्व बाल गणेश उत्सव मंडळ कुडेगाव पोलीस स्टेशन पालांदुर अंतर्गत प्रथम कमांक श्री. संताजी गणेशोत्सव मंडळ पालांदुर, व्दितीय कोलबास्वामी गणेश मंडळ पालांदुर, तृतीय क्रमांक नवयुक गणेशोत्सव मंडळ किटाळी पोलीस स्टेशन वरठी अंतर्गत प्रथम क्रमांक हनुमान व्यायाम शाळा गणेश उत्सव मंडळ मोहगांव देवी व्दितीय कमांक श्री. बालगणेश उत्सव मंडळ मोहगांव देवी, तृतीय क्रमांक एकता गणेश मंडळ एकलारी पोलीस स्टेशन मोहाडी अंतर्गत प्रथम क्रमांक रानी अवंतीबाई गणेश मंडळ मांडेसर, व्दितीय क्रमांक आदर्श गणेश उत्सव मंडळ मोहाडी, तृतीय क्रमांक स्वप्र पुर्ती गणेश मंडळ मोहाडी, पोलीस स्टेशन करडी अंतर्गत प्रथम क्रमांक सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ पालोरा, व्दितीय क्रमांक आदिवासी महिला सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ नरसिंहटोला तृतीय क्रमांक एकता महिला मंडळ करडी, सर्व पोलीस स्टेशन स्तरावरील गणेश मंडळाला रोख रक्कम स्मृतीचिन्ह, पारितोषीक देण्यात आले. भंडारा जिल्हास्तरीय प्रथम पारीतोषीक २५,०००/- रु. हनुमान व्यायाम शाळा मोहगाव देवी, व्दितीय पोरीतोषीक १५,०००/- रु. गणेश उत्सव मंडळ साकोली, तृतीय क्रमांक १०,००० /- रु. तुमसर महाराजा मंडळ यांना रोख रक्कम व पारीतोषीक देण्यात आले.

यावेळी कार्यकमाला गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदसिध्द अध्यक्ष, पोलीस बाईज, सहायक पोलीस निरीक्षक श्री. अभिजीत पाटील, यानी कार्यक्रमाला सहकार्य केले. राखीव पोलीस निरीक्षक श्री. रघुनाथ चौधरी, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मपोहवा. योगीनी नागतोडे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांनी केले आहे.