जिल्हाधिका-यांची अशोक लेलॅड  कंपनीला भेट प्रशीक्षणार्थ्यांशी संवाद

जिल्हाधिका-यांची अशोक लेलॅड  कंपनीला भेट प्रशीक्षणार्थ्यांशी संवाद

           भंडारा दि.12:शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाखनी ,येथील जोडारी व्यवसाय या प्रशिक्षणाची विदयार्थ्याची बॅच अशोक लेलँड गडेगांव येथे प्रशिक्षण्‍  घेत आहेत.

          या ट्रेनिंग मध्ये एकूण 17 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असून यामध्ये 5 मुलींचा सहभाग आहे. अशोक लैलँड गडेगांव येथे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींना काल जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाखनी प्राचार्या. जे. व्ही. निंबार्ते, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी यांनी  अशोक लेलॅड कंपनीला भेट दिली.यावेळी  अशोक लेलॅडचे रमाकांत शर्मा, रमेश घारगे तसेच उत्पादन प्रमुख एम.जी.देशमुख उपस्थित होते.

          या कंपनीच्या कामकाजाची विस्तृत माहिती श्री.शर्मा यांनी  जिल्हाधिका-यांना दिली.

प्रशिक्षणार्थ्याना ऑन जॉब ट्रेनींग  तसेच  सीएनसी मशीनवरील कामे,तसेच  प्रशिक्षणार्थ्याचा प्रशिक्षण कालावधी आणी  कौशल्य विकास तसेच  प्रत्यक्ष जॉब करतांना आवश्यक असलेले अन्य तांत्रीक बाबीविषयी जिल्हाधिका-यांनी  प्रशिक्षणार्थ्याशी संवाद साधला.