आरोग्य विभागामार्फत 13 फेब्रुवारी पासून राष्ट्रीय जंतनाशक दिनाची सुरुवात

आरोग्य विभागामार्फत 13 फेब्रुवारी पासून राष्ट्रीय जंतनाशक दिनाची सुरुवात

गडचिरोली, दि.12:२० राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ ला जिल्हयात आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय जंतनाशक दिन दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ व 20 फेब्रुवारी २०२४ ला मॉप अप दिन राबविण्यात येत आहे.
जिल्हयात आरमोरी व चामोर्शी तालुका वगळता उर्वरीत तालुक्यातील १ ते १९ वयोगटातील २,२४,१०३ बालके आहेत. या वयोगटातील मुलांना या परजीवी जंतापासुन आजार उदभवण्याचा धोका आहे. दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार सहजतेने होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुपोषण, रक्तक्षय, पोट दुखी, भुक मंदावने, अतिसार, शौचामध्ये रक्त पडणे, आतडयावर सुज येणे इत्यादी समस्या निर्माण होतात.
राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उददेश- राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उददेश हा १- १९ वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवुन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जिवनाचा दर्जा उंचावणे हा आहे.
जिल्हयात मोहिमेची अंमलबजावणी-दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ ला मॉप अप दिन जिल्हयातील मोहिमेकरीता १ ते १९ वयोगटातील पात्र लाभार्थी- २, २४, १०३ ( १ ते ६ वर्ष वयोगटातील अंगणवाडीतील बालके ६५,३८१), ( ६ ते १० वर्ष वयोगटातील बालके ५४,९८२ ), ( १० ते १९ वर्ष वयोगटातील बालके १,०३,७४०) .
मोहिमेमध्ये कार्यरत मनुष्यबळ (नोडल शिक्षक + आशा + अंगणवाडी सेविका)- ४६६० यामध्ये अंगणवाडी + मिनी अंग. १७५०, एकुण नोडल शिक्षक १६८१, (शासकीय / अनुदानित शाळा १५१७, खाजगी शाळा १५१, तांत्रिक संस्था १३) आशा १२२९)
जिल्हयातील एकुण बुथची संख्या ( अंगणवाडी केंद्र+ शाळा)- ३४३१( अंगणवाडी + मिनी अंग. १७५०) (शाळा १६८१)
लाभार्थ्याना देण्यात येणाऱ्या उपलब्ध गोळयांची संख्या-६०६७०९
औषधीची मात्रा- औषधाचे नांव Tab Albendazole 400 mg वयोगट ते 1 ते 2 वर्षे, औषधीची मात्रा अर्धी गोळी (अल्बेंडाझोल २०० मि.ग्रॅ)| पावडर करून व पाण्यात विरघळून पाजावी. 2 ते 3 वर्षे एक गोळी (४०० मि.ग्रॅ) पावडर करून पाण्यात विरघळुन पाजावी.), ३ ते १९ वर्ष एक गोळी ४०० मि.ग्रॅ चावून खाण्यास लावणे.

जंताचा प्रार्दुभाव होणार नाही याकरीता पुढील प्रमाणे दक्षता घ्यावी- जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे. भाजी व फळे खाण्यापूर्वी व्यवस्थित धुणे. स्वच्छ व उकडून थंड केलेले पाणी प्यावे. पायात चपला व बुट घालावे. नियमित नखे कापावी., शौचालयाचाच वापर करावा, उघड्यावर शौचास बसू नये. परिसर स्वच्छ ठेवावा.
राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उददेश हा १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुलां- मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावने हा आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ ला मॉप अप दिन बाबत जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा दिनांक ३० जानेवारी २०२४ ला घेण्यात आली. समिती सभेमध्ये सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थीत होते. या मध्ये शिक्षण विभाग, महीला व बालकल्याण विभागाशी समन्वय साधुन कार्यक्रम यशस्वीपणे राबविणेबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३० जानेवारी २०२४ ला व्हि.सी.व्दारे ता.आ.अधि./वै.अधि./सी.डी.पि.ओ./बि.ई.ओ./आ.सहा सर्व/बि.सी.एम./आय.एफ.एम.यांची राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ ला मॉप अप दिन राबविणे याबाबतचे प्रशिक्षण घेऊन मार्गदर्शन केले.
याकरीता जिल्हयातील सर्व अंगणवाडी, शाळा मधील सर्व १ ते १९ वर्ष या वयोगटातील मुलां-मुलींकरीता जंतनाशक गोळया अंगणवाडी सेविका, आशा व शिक्षकांमार्फत खावू घालणार आहेत. तरी याचा लाभ घेण्यात यावा व या कार्यक्रमाला सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन डॉ. दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गडचिरोली यांनी केले आहे.