गहु,हरबरा पिक विमाधारक शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत विमा कंपनीकडे तक्रार करावी
कृषी विभागाचे आवाहन
भंडारा,दि.12 : जिल्हयात अतिवृष्टी अवकाळी पाऊस व दुष्काळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होते.पिक विमा योजनेच्या अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरते. योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अर्जदार शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती गारपीट,भुस्खलन,विमा संरक्षण क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामध्ये झालेल्या नुकसाणाची पुर्वसूचना नुकसानिच्या 72 तासाच्या आत देणे गरजेचे असते.
भंडारा जिल्हयाकरिता चोलामंडलम जनरल इंसुरंश कंपनी तीन वर्षाकरिता पिक विमा कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर पिक विमा सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे.
जिल्हयात 10 फेब्रुवारी, 2024 या दिनाकापासून अवकाळी पाऊस पडल्यामुळे गहु व हरभरा पिकांचे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजने रब्बी हंगाम 2024 अंतर्गत गहु व हरभरा पिकांचा पिक विमा काढलेला आहे.व ज्यांचे नुकसान झाले आहे.अशा शेतकऱ्यांनी नुकसानिच्या 72 तासाच्या आत खालील दिलेल्या मार्गाने तक्रार करावी,
तसेच विमा कंपनीचा टोल फ्रि.क्रमांक 18002089200, Crop lnsurance APP किंवा ई-मेल क्र.customercare@cholams.murugappa.com किंवा संबंधित बॅक, कृषि विभाग व पिक विमा कार्यालय मार्फत तक्रार करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भंडारा विभागानी कळविले आहे.