सर्वोदय महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न

सर्वोदय महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथील राष्ट्रीय सेवा योजनाचा शिबिर ग्रामपंचायत विरव्हा ता.सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथे २९ जानेवारी ते ०३ फेब्रुवारी २०२४ येथे पार पडला.डॉ. लेमदेव नागलवाडे रा.से.यो .कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. शिबिराचे उद्घाटन मां. मनोहररावजी नन्नेवार यांनी केले.या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष मा.योगेंद्रजी जयस्वाल, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. राजेश डहारे, सामाजिक कार्यकर्ते रामदास शेंडे ,सौ.छायाताई चौधरी सरपंच, श्री.राजेंद्र सावसाकडे पोलिस पाटील, श्री. विनोद चौधरी अध्यक्ष तंटामुक्ती,विनोद नन्नावरे अध्यक्ष शाळा समिती, श्री.काशिनाथ टेकाम अध्यक्ष वन समिती विरवा, मां.तामदेवजी कावळे मुख्याध्यापक उच्च प्राथमिक शाळा विरव्हा, महाविद्यालयातील प्राध्यापक व गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होती.
या शिबिरात विद्यार्थी रोज सकाळी ५:३० वाजता उठून प्रार्थना व योगगुरु सैनी मॅडम यांच्या नेतृत्वात योगा करीत.त्यानंतर श्रमदानाद्वारे ग्राम स्वच्छता करत. यात विद्यार्थ्यांनी मंदिर, विहार व गावातील परिसराची सफाई केली. तसेच गावातील नदीवर लोकांच्या रहदारी करिता रपटा बांधला. शिबिरातील विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम म्हणून गावाजवळील शेतीवर त्यांना रोवणीचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले. तसेच विद्यार्थ्यांनी रोज सायंकाळी विविध खेळ खेळले व रात्री ८ ते १० वाजता गावकऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे समाज प्रबोधन केले.
या सात दिवशीय शिबिरात भाषा : एक उपजीविकेचे साधन, महाविद्यालयीन शिक्षणात रासेयो चे महत्व,महिला सुरक्षा व शासनाची जबाबदारी, मतदार जागृती व प्रशासकीय कार्याचे महत्त्व, सेंद्रिय शेती विकास,तरुणाकरता बँकेच्या योजना व सहकार्य इत्यादी विषयावर उदबोधन कार्यक्रम घेण्यात आले. यात विविध विषय तज्ञांनी विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिराचा समारोपीय समारंभ दिनांक ०३/०२/२०२४ ला संस्थेचे अध्यक्ष मा.योगेंद्रजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. समारोपीय समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ.पितांबर पिसे यांनी समारोपीय मार्गदर्शन करताना रासेयो मधुन विद्यार्थी विद्यार्थीनी ना व्यक्तीमत्व विकास करता येतो असे सांगून मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांनी उत्साहाने सात दिवसांत जे काही काम केले त्याचे अनुभव कथन केले, त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता रामदासजी शेंडे, पोलीस पाटील राजेंद्र सावसाकडे , सरपंच सौ छायाताई चौधरी यांनी शिबिरार्थ्यांना शुभेच्छा व विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले, प्रास्ताविक कार्यकारी प्राचार्य डॉ. राजेश डहारे यांनी केले तर रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.लेमदेव नागलवाडे यांनी गावकऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले गावकऱ्यांनी डॉ नागलवाडे, कार्यकारी प्राचार्य डॉ राजेश डहारे व अध्यक्ष योगेंद्रजी जयस्वाल यांचा सत्कार केला.