मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करा Ø राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांचेकडून चंद्रपूरचा आढावा

मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करा Ø राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांचेकडून चंद्रपूरचा आढावा

चद्रपूर दि. 31 : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचे काम विहित वेळेत (दि.31 जानेवारीपर्यंत) पूर्ण करण्याच्या सूचना आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी येथे दिल्या.

श्री मेश्राम यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्वेक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी विनय गौडा, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, सर्व तहसिलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व समन्वयक अधिकारी यावेळी उपस्थित होते.