भीमराव पांचाळे यांच्या गजल मैफीलीने रसीक  सुखावले / महासंस्कृती महोत्सवाला सुरांची उधळण

  जखमा अश्या सुंगधी झाल्यात काळजाला….

  भीमराव पांचाळे यांच्या गजल मैफीलीने रसीक  सुखावले

  महासंस्कृती महोत्सवाला सुरांची उधळण 

           भंडारा, दि.30: रसीकांच्या कान व मनाची तृप्ती  करणारे  प्रख्यात गजलनवाज भीमराव पांचाळे यांचे स्वर..किशोर बळीचे तितकेच चपखल संचलन ,दाद देणारे रसीक तसेच वाहवा मिळवणारे ईलाही जमादार यांचे शेर  जखमा अश्या सुंगधी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने तो मोगरा असावा..

             प्रत्येक रसीक हा बोलका शायरच असतो.51 वर्ष गझलची साधना करणारे गझलगायक भीमराव पांचाळे व त्यांची कन्या भाग्यश्री पांचाळे यांच्या मैफीलीने काल महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या संध्याकाळी रसीकजनांना गजलेची कर्णमधुर पर्वणी उपलब्ध करून दिली. आयुष्यात मैत्र असेल तर श्रीमंती असते..हे सांगताना यार पाहिजे तुझ्यासारखा..आधार दे तुझ्यासारखा..या शेराने मैफीलीला उंची दिली.जीवनाला दान दयावे लागते श्वास संपेपर्यत जगावे लागते,

         हा शेर असो की पेरल्या ज्यांनी सुरुंगाच्या लडी दोस्त त्यांनाही म्हणावे लागते..हे ही कटू सत्य सांगणा-या गजलेला रसीकांची दाद मिळाली. भाग्यश्री पांचाळेनी जीवलग माणसाचे आयुष्यातील स्थान सांगताना  तू फुलांचा घोस माझा.. तू सुंगधी श्वास माझा म्हणत रसीक मनांची तार छेडली. तर अमरावतीच्या नितीन भटाची  नको हे गगन नको ही धरा.. दे मनाचा रीता कोपरा.. गझल ही प्रेमाच्या पलीकडेही सामाजिक परिमाण घेउून येते.तेव्हा प्रश्न विचारते..

            माणसातच देव जर आहे म्हणे.. पत्थरांना का पुजावे लागते .. या प्रश्नांनी रसीकांना विचार करण्यास प्रवृत्त्‍ केले.रात्री आठ वाजता सुरू झालेल्या या मैफीलीला शुंभागीताई मेंढे,जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाचे अधिकारी,जिप पदाधीकारी व माध्यम प्रतिनीधी तसेच रसीकांची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती. तत्पुर्वी रयतेचा राजा हे नाटक असर फॉऊडेंशने सादर केले.70 कलावंताच्या चमूने शिवाजी महाराज्याच्या अष्टपैलु व्यकतीमत्वाचे यथोचित सादरीकरण केले.त्यांचा सत्कार करण्यात आला.

           याच मंचावर गझलकार प्रल्हाद सोनावणे, साहीत्यीक प्रमोदकुमार अणेराव व नरेश आंबिलकर यांचा हृदय सत्कार करण्यात आला. महासंस्कृती महोत्सवात आज आयुष्यावर बोलु काही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महासंस्कृती महोत्सव निमित्त भंडारा येथे पाच दिवसीय सांस्कृतिक व कृषी प्रदर्शनीचे आयोजन रेल्वे ग्राउंड खात रोड भंडारा येथे करण्यात आले आहे. आज 26 जानेवारी गणतंत्र दिवसी मा. श्री.डॉ.विजयकुमार गावित, पालकमंत्री भंडारा जिल्हा व श्री सुनील मेंढे खासदार भंडारा ह्यांच्या प्रदर्शनीचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.

            प्रदर्शनीत ‘सेव इकोसिस्टम अँड टायगर’ (सीट) संस्थे द्वारा भंडारा जिल्ह्याचे निसर्ग व वन पर्यटन विषयाच्या   माहितीपरक व जिल्ह्यातील वाइल्डलाइफ फोटोग्राफरच्या फोटो चे लावण्यात आलेल्या स्टॉलला माननीय पाहुण्यांनी भेट देवून उपक्रमाची प्रशंसा केली.

            तसेच अध्यक्ष जिल्हा परिषद श्री गंगाधरजी जिभकाटे, जिल्हाधिकारी श्री योगेश कुभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा श्री समीर कुर्तकोटी, पोलिस अधीक्षक श्री लोहित मतानी, उपवन संरक्षक श्री राहुल गवई , उपजिल्हाधिकारी श्रीमती लिना फालके, सहाय्यक वन संरक्षक श्री नीलख ह्यांनी सुद्धा सीट च्या स्टॉल ला भेट दिली.