गाव चलो अभियान अंतर्गत सर्वव्यापी, सर्वसमावेशक संपूर्ण समाजाला जोडण्याचे आणि एकत्र आणण्याचे अभियान – खासदार अशोक नेते.

गाव चलो अभियान अंतर्गत सर्वव्यापी, सर्वसमावेशक संपूर्ण समाजाला जोडण्याचे आणि एकत्र आणण्याचे अभियान – खासदार अशोक नेते.

भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने गाव चलो अभियान कार्यशाळा आयोजित..

गडचिरोली:- आज दि.२८ जानेवारी २०२४ रोज रविवार ला भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने गाव चलो अभियान कार्यशाळेचे आयोजन महाराजा सेलिब्रेशन लॉन धानोरा रोड,गडचिरोली येथे करण्यात आले होते.

या कार्यशाळेचे उद्घाटन खासदार अशोक नेते हे होते.यावेळी मचांवर प्रामुख्याने वि.प.आम.डॉ. रामदास आंबडकर,जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,सहकार महर्षी अरविंद सा.पोरेड़्डीवार, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान आघाडी मोर्चा चे प्रदेश सचिव रमेश भुरसे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री योगीताताई पिपरे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, महिला आघाडी मोर्चा च्या जिल्हाअध्यक्षा गिताताई हिंगे,जेष्ठ नेते गजानन येंगदलवार,युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर,किसान आघाडी चे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, व्हीजेएन मच्छीमार आघाडी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष मोहन मदने, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, गोवर्धन चव्हाण आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, गाव चलो अभियान हे सर्वव्यापी, सर्वसमावेशक संपूर्ण समाजाला जोडण्याचे आणि एकत्र आणण्याचे अभियान आहे.असे उदघाटन स्थानावरून बोलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ देशात उत्स्फूर्त वातावरण असून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश सकारात्मक उर्जेने भरलेला आहे. आज, भारतातील सर्व विभाग आणि क्षेत्रांच्या विकासासह, भारताचा गौरव झाला आहे.

विकासित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून कल्याणकारी योजना जमिनीवर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मोदी सरकारवरील जनतेचा विश्वास सतत वाढत आहे. जनता भाजपला कधी साथ देईल याची वाट पाहत आहे. चला गाव चलो मोहिमेअंतर्गत लोकांमध्ये जाऊया आणि त्यांना सशक्त भारत, स्वावलंबी भारत आणि विकसित भारत बनवण्याचा संकल्प करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज मोदी सरकारच्या काळात गावातील गरिबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडले जात आहे.असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी या गाव चलो अभियान कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

पुढे बोलताना भारतीय जनता पार्टी हा जगामध्ये ‌सर्वात मोठा पक्ष आहे.भाजपा हाच इतर पक्षाच्या तुलनेत एक नंबरचा पक्ष असून सताधारी पक्ष आहे.याचे तुम्ही पदाधिकारी, कार्यकर्ते आहात. याकरिता पक्ष संघटनेला जोमाने कामाला लागून भाजपा संघटनेचे काम करावे. असे आवाहन खा.नेते यांनी या गाव चलो अभियान कार्यशाळा‌ निमित्याने केले.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक किसान आघाडी चे प्रदेश सचिव रमेश भुरसे, संचालन जिल्हा महामंत्री सदानंद कुथे व आभार प्रदर्शन जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांनी केले.