13 फेब्रुवारी रोजी ब्रम्हपुरी आयटीआय मधील निरुपयोगी साहित्यांचा लिलाव

13 फेब्रुवारी रोजी ब्रम्हपुरी आयटीआय मधील निरुपयोगी साहित्यांचा लिलाव

चंद्रपूर, दि. 29 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रह्मपुरी येथील विविध व्यवसायातील निरुपयोगी, कालबाह्य झालेली निर्लेखित संयत्रे, साहित्य, उपकरणे आहे त्याच अवस्थेत विक्री करावयाचे आहे. याकरीता दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता लिलाव आयोजित करण्यात आला आहे.

इच्छुक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खेड रोड, शिवाजीनगर, ब्रह्मपुरी येथे अधिकृत लेख्यासह उपस्थित राहावे. असे ब्रह्मपुरी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर.एम. डांगे यांनी कळविले आहे.