कृषि महोत्सवामध्ये पौष्टीक तृणधान्य पाककला स्पर्धा संपन्न

कृषि महोत्सवामध्ये पौष्टीक तृणधान्य पाककला स्पर्धा संपन्न

भंडारा दि. 28 : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा व कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २६ ते ३० जानेवारी कालावधीत रेल्वे मैदान खात रोड भडारा येथे आयोजित जिल्हा कृषि महोत्सव अंतर्गत युनो ने घोषित केलेले आंतरराष्ट्रिय तृणधान्य वर्ष २०२३ चे औचित्य साधुन दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी पौष्टीक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जगण्याच्या शर्यतीत व रोजच्या धावपळीत निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा म्हणजे तृणधान्यांचा रोजच्या आहाराप्त समावेश करण्याचा आपल्याला विसर पडलेला आहे. आपल्या पूर्वजांना लाभलेले सुदृढ आरोग्याचा रहस्य म्हणजे त्यांच्या आहारात असलेल्या पौष्टीक तृणधान्याचा समावेश हा उद्दात हेतु डोळयासमोर ठेऊन या पाककला स्पर्धेचे आयोजन आयोजकांमार्फत करण्यात आल होते.

सदर स्पर्धेत ३२ महिलानी स्पर्धकानी नोंदणी केली होती. त्यानी तयार केलेले ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, भगर, राळा या तृणधान्यापासुन तयार केलेले ७० प्रकारचे पदार्थ प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. त्यामध्ये रागी कुकीज, ज्वारी कुकीज, ज्वारीचा उपमा, ज्वारी, बाजरी राजगिरा नाचणीची चकली, नाचणीचा ढोकळा, नाचणीची बर्फी, राजगिरा हलवा ई. नाविण्यापुर्ण व चविष्ट पदार्थांचा समावेश होता.

या प्रदर्शनाला भंडारा पवनी मतदारसंघाचे आमदार मा.श्री. नरेंद्र मोडेकर यांनी भेट देऊन सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करुन आपले योगदान अमुल्य असल्याचे गौरवोद्‌गार काढले, या प्रसंगी मा. आमदार साहेबांचे स्वागत भंडारा येथे निर्मित सेंद्रीय गुळ व भौगोलिक नामांकन प्राप्त चिन्नोर तांदुळाचे पॅकेट देऊन करण्यात आले.

सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नाचणी कुकीज, ज्वारी कुकीज व रागी कुकीज तयार करणाऱ्या श्रीमती शितल दिवाकर भाकरे भंडारा यांनी पटकविला, व्दितिय पुरस्काराचे मानकरी श्रीमती दिया मनोहर भिवगडे भंडारा यांचे तृणधान्य नुट्रीबार, वरई कडे, राईस ज्वारी चिवडा हे ठरले. तर साकोली च्या श्रीमती वंदना राधेश्याम वैद्य यांनी सादर केलेले बाजरीचे पापड व आंचील यांनी तृतीय बक्षीस पटकविले. विजेत्यांना श्रीमती मिरा खड़कर आहरातज्ञ नागपुर व श्री. गौरव गोमासे प्रसिध्द शेफ नागपुर या परिक्षकाच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रमामध्ये नागपुर चे प्रसिध्द शेफ श्री. गौरव गोमासे यांनी उपस्थित महिलांना नाचणी सुप, राजगिरा कोशिबीर, कांगणी, काबुली चना सॅलैंड, वरई पुलाव, नाचणी लाडु ई. पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण कृतिः प्रात्याक्षिकामार्फत दिले. पाककला स्पर्धेला मा. जिल्हाधिकारी श्री. योगेश कुभेजकर यांनी भेट देऊन स्पर्धकांचे प्रदर्शनीतील पदार्थांचे आस्वाद घेतले व सर्व स्पर्धकाचे अभिनंदन केले.