गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटूंबियांना अॅक्सिस बँकेने दिला मदतीचा हात

गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटूंबियांना अॅक्सिस बँकेने दिला मदतीचा हात

• पोलीस उपमहानिरिक्षक सा. व मा. पोलीस अधीक्षक सा. यांचे हस्ते दोन कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयाचा धनादेश स्वाधीन .

बँक म्हणजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किंवा त्यांना कर्ज देणारी यंत्रणा अशी नागरीकांमध्ये ओळख असुन एक पाऊल पुढे जात आपल्या खातेधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्यांच्या कुटुंबियांना आर्थीक आधार देण्याचा नवा आदर्श अॅक्सिस बँकेने ठेवला आहे. दिनांक २८/०६/२०२३ रोजी गडचिरोली पोलीस दलातील कार्यरत कर्मचारी अब्दुल वाहीद अब्दुल हमीद शेख यांचे दिर्घ आजाराने निधन झाले होते त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर मोठे संकट कोसळले. ही समस्या ओळखुन अॅक्सिस बँकेने मदतीचा हात पुढे करीत त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती शगुफ्ता अब्दुल वाहीद शेख यांना आर्थीक मदत स्वरुपात मा. श्री. संदिप पाटील सा. पोलीस उपमहानिरिक्षक परिक्षेत्र गडचिरोली (कॅम्प नागपुर) यांचे हस्ते आज दि. २४/०१/२०२४ रोजी १० लाख रुपयाचा धनादेश अदा करण्यात आला.

तसेच यापुर्वी दिनांक ०१ जुलै २०२३ रोजी गडचिरोली पोलीस दलातील कार्यरत कर्मचारी रोशन हरी राऊत यांचे कॅन्सर या आजाराने निधन झाले होते. त्यांना देखील अॅक्सीस बँकेच्या मदतीने रोशन हरी राऊत याच्या पत्नी श्रीमती ऊषा हरी राऊत यांना दि. १२/०१/२०२४ रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे हस्ते १० लाख रुपयाचा धनादेश अदा करण्यात आला होता.

यावेळी मा. पोलीस उपमहानिरिक्षक परिक्षेत्र गडचिरोली (कॅम्प नागपुर) श्री. संदिप पाटील सा., मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. तसेच अॅक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक, श्री. राकेश राजेंद्र वल्लालवार व उप-शाखा व्यवस्थापक श्री. मुर्लीधर नैताम यांचे उपस्थितीत मृत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना धनादेश स्वाधीन करण्यात आला.