सन 2023-24 रब्बी पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर

सन 2023-24 रब्बी पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर

गडचिरोली, दि.24: गडचिरोली जिल्ह्यात एकूण 1689 गावे असून खरीप पिकाची गावे 148 आहेत. त्यापैकी रब्बी गावांमध्ये पीके नसलेली गांवे 94 आहेत. सदर रब्बी पिक असलेल्या गावांपैकी 50 पैशाचे आत पैसेवारी असलेले 0 असून, 50 पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकूण रब्बी पिक असलेल्या गावांची संख्या 54 आहेत. अशा प्रकारे एकूण 54 गावांमधील रब्बी पिकाची हंगामी पैसेवारी जाहिर केलेली आहे. गडचिरोली जिल्ह्याची रब्बी पिकाची 2023-2024 या वर्षाची हंगामी पैसेवारी ही 0.62 रु.पै. आहे. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.