स्वाधार योजनेच्या अर्जांच्या त्रुटीच्या पुर्ततेकरिता शिबिराचे आयोजन…

स्वाधार योजनेच्या अर्जांच्या त्रुटीच्या पुर्ततेकरिता शिबिराचे आयोजन…

 

भंडारा, दि. 8 : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज छाननी करून भोजन, निवास भत्ता, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, इतर सुविधा विद्यार्थ्यांनी स्वत: उपलब्ध करण्याकरिता व त्रृटीविषयक बाबींची पुर्तता करून विद्यार्थी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण येथे दिनांक 8 डिसेंबर 2022 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

योजनेतील अर्जांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी शिबीरात अर्ज तपासणी, त्रृटीची पुर्तता करणे, जिल्ह्यातील व्यावसायिक, बिगर व्यावसायिक, इतर महाविद्यालयातील विद्यार्थी यांचे स्वाधार योजनेचे अर्ज पात्र ठरविण्याकरिता व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी त्यांना संधी देवून निपटारा करण्याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी विद्यार्थींनी सहभाग घेवून अर्जातील त्रृटींची पुर्तता करावी, असे आवाहन सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.