गोसेखुर्द धरणातून अचानक केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे दुर्घटना…

गोसेखुर्द धरणातून अचानक केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे दुर्घटना झाल्याचा अंदाज

खासदार नेते यांची घटनास्थळावर धाव

खासदारांनी गोसेखुर्दच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच खासदार अशोक नेते यांनी घटनास्थळ असलेल्या गणपूरजवळील नदीकाठावर जाऊन पाहणी केली आणि संबंधित महिलांच्या कुटुंबियांना व गावकऱ्यांना दिलासा दिला. या अपघातात बचावलेल्या सारूबाई कस्तुरे यांना चांगले उपचार देण्यासोबत बेपत्ता महिलांचा लवकर शोध घेण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

विशेष म्हणजे गोसेखुर्द धरणातून अचानक केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीचा प्रवाह वाढून ही दुर्घटना झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गोसेखुर्दच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी खासदार नेते यांनी फोनवरून संपर्क करून त्यांना धारेवर धरले. नदीकाठावर राहणाऱ्या सर्व लोकांना पूर्वसूचना देऊन, सावध करूनच धरणातील पाणी सोडावे, असे सांगत या घटनेची चौकशी करा आणि संबंधितांवर कारवाई करा, असेही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले.

यावेळी अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, एसडीपीओ मयुर भुजबळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल वरघंटे, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, गणपूरचे सरपंच सुधाकर गदे, उपसरपंच जीवनदास भोयर, विनोद गौरकर यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.