मुद्रांक शुल्क अभय योजनेचा नागरीकांनी लाभ घ्यावा मुद्रांक जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे आवाहन

मुद्रांक शुल्क अभय योजनेचा नागरीकांनी लाभ घ्यावा
मुद्रांक जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे आवाहन

गडचिरोली, दि.18:शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत “अभय योजना-2023” लागु केली आहे. ही योजना 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 अशा दोन टप्यात लागु केलेली आहे. सदर अभय योजनेनुसार- दिनांक 1 जानेवारी 1980 ते दिनांक 31 डिसेंबर 2000 या कालावधीत निष्पादीत झालेल्या दस्त ऐवजाचे संदर्भात पहिला टप्पा :- दिनांक 01.12.2023 ते दिनांक 31.01.2024 या कालावधीत अर्ज सादर केल्यास अ) रुपये 1 ते रुपये 1 लाख इतक्या फरकाने रक्कमेसाठी मुद्रांक शुल्क व दंडामध्ये 100% माफी दिली आहे. ब) रुपये 1 लाखापेक्षा जास्त मुद्रांक शुल्क शुल्क 50% माफ व दंड 100% माफ केला आहे.
दुसरा टप्पा :- दिनांक 01.02.2024 ते दिनांक 31.03.2024 या कालावधीत अर्ज सादर केल्यास- अ) रुपये 1 ते रुपये 1 लाख इतक्या फरकाने रक्कमेसाठी मुद्रांक शुल्क 80% व दंडामध्ये 80% माफी दिली आहे. ब) रुपये 1 लाखापेक्षा जास्तचे प्रकरणात मुद्रांक शुल्क 40% माफ व दंड 70% माफ केला आहे.दिनांक 1 जानेवारी 2001 ते दिनांक 31 डिसेंबर 2020 या कालावधीत निष्पादीत झालेल्या दस्त ऐवजाचे संदर्भात- पहिला टप्पा :- दिनांक 01.12.2023 ते दिनांक 31.01.2024 या कालावधीत अर्ज सादर केल्यास अ) रुपये 1 ते रुपये 25 लाख इतक्या फरकाने रक्कमेसाठी मुद्रांक शुल्क 25% व दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा कमी असल्यास 90% माफी व दंडाची रक्कम रुपये 25 लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ रुपये 25 लाख भरणे व त्यापुढील रक्कमेस सवलत. ब) रुपये 25 कोटी पुढील जास्त असलेल्या मुद्रांक शुल्क फरकाने मुद्रांक शुल्कामध्ये 20% सवलत व दंडामध्ये रुपये 1 कोटी फक्त भरावयाचे व पुढील रकमेसाठी सवलत.
दुसरा टप्पा :- दिनांक 01.02.2024 ते दिनांक 31.03.2024 या कालावधीत अर्ज सादर केल्यास- अ) रुपये 1 ते रुपये 25 कोटी इतक्या फरकाने रक्कमेसाठी मुद्रांक शुल्क 20% सवलत व दंडामध्ये 1. दंडाची रक्कम रुपये 50 लाखापेक्षा कमी असल्यास 80% माफी आणि जर 2. दंडाची रक्कम रुपये 25 लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ रुपये 50 लाख भरणे व त्यापुढील रक्कमेस सवलत ब) रुपये 25 कोटीपेक्षा जास्त असलेल्या मुद्रांक शुल्क फरकाचे रक्कमेसाठी मुद्रांक शुल्कामध्ये 10% सवलत दंड जास्तीत जास्त रुपये 2 कोटी भरावा लागेल व त्यापुढील रक्कमेस सवलत.
शासनामार्फत सुरु असलेल्या “अभय योजना-2023” अंतर्गत दंड सवलत योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच या मुद्रांक कार्यालयामार्फत ज्यांना मुद्रांक शुल्क भरण्याबाबत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता शहरी व ग्रामीण भागातील नागरीकांनी आपला अर्ज सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, कार्यालय गडचिरोली प्रशासकीस इमारत, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली पिन कोड-442605 या कार्यालयात किंवा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात सादर करावा, असे आवाहन प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकरी, गडचिरोली अंकिता अ. तांदळे यांनी केले आहे.